पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (स्थापना १९५८) ही घाटगे समूहातील सर्वांत जुनी संस्था. २०१८ सालच्या डिसेंबरमध्ये तिला ६० वर्षे पूर्ण होतील. त्या पाठोपाठ मोहन ट्रॅव्हल्स (स्थापना १९६८), केजीपी ऑटो लिमिटेड (स्थापना १९७२), तेज कुरियर (स्थापना १९९२), माई हुंदाई (स्थापना १९९८), माई टीव्हीएस (स्थापना २००२), चेतन मोटर्स (स्थापना २००४), घाटगे ट्रकिंग (स्थापना २०१२), रोहर्ष मोटर्स (स्थापना २०१२) आणि ट्रिनिटी मोटर्स (स्थापना २०१६) या समूहातील कंपन्या स्थापन झाल्या. यातील शेवटच्या तीन कंपन्या पुणेस्थित आहेत. सध्या घाटगे उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल साधारण १००० कोटी रुपये असून कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सुमारे २५०० आहे. पुढील पाच वर्षांत ही उलाढाल दुप्पट करायचे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले आहे. वसंतरावांचे अनेक गुण तिस-या पिढीतही उतरल्याचे दिसते. आपल्या आजोबांचा वारसा या पिढीलाही प्रेरणादायी वाटतो आणि त्यांच्याविषयी आजही कृतज्ञता वाटते. या तिसऱ्या पिढीतील तीन उदाहरणे प्रातिनिधिक म्हणून उथे विचारात घ्यायला हरकत नाही. पहिले उदाहरण म्हणजे डॉ. सुलभा आणि डॉ. अरुण दाते यांचे धाकटे चिरंजीव रणजित दाते. न्यूयॉर्क स्टेट येथील Rensselaer Polytechnic Institute येथून त्यांनी रोबोटिक्स या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. पुण्याजवळील Precision Automation and Robotics India (PARI) ह्या नामांकित कंपनीचे रणजित हे संस्थापक प्रमुख आहेत. रोबोटिक्स ऊर्फ यंत्रमानव बनवणारी ही कंपनी ह्या अतिशय आगळ्यावेगळ्या व हायटेक म्हणतात तशा क्षेत्रातील भारतातील सर्वांत मोठी आणि जगातील पहिल्या दहा कंपन्यांमधील एक आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातले प्रमुख वाहन उत्पादक यांचे उत्पादन वापरतात. 'स्वतःचं असं काहीतरी वेगळं करा' असे वसंतरावांचे सगळ्यांना सांगणे असे आणि रणजितनी ते शब्दशः अमलात आणले आहे. रणजित म्हणतात, “आजोबांविषयी माझ्या आठवणी ज्या काळातील आहेत त्या काळात त्यांची प्रकृती ठीक नसायची. तरीही त्यांनी आम्हां नातवंडांसाठी नेहमीच वेळ काढला. कितीही काम असलं, तरी ते आमच्यासाठी वेळ वसंतवैभव | २३२ ।