Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवटी माईने एक कागदाची घडी काढली. मला वाटलं, ही काही बोलेल; पण सर्वांनाच आश्चर्य वाटेल असं घडलं. माईने आम्हा दोघांच्यावर एक सुरेख कविता करून आणली होती. ती तिने वाचून दाखवली. आमचं त्यात खूप कौतुक जरूर केलं होतं; पण त्याचबरोबर आयुष्यात कसं वागावं ह्याचंही तिने छान वर्णन केलं होतं. माई इतक्या छान कविता करते हे आमच्या पूर्वी कधीच लक्षात आलं नव्हतं. नंतर पुन्हा तिने निर्मलामामीच्या एकसष्टीलासुद्धा छान कविता केली होती. ती खरंच एक उत्तम कवयित्री होती; पण तो गुण तिने कधी विकसित केला नाही. "माई, तुझ्यामुळे आम्ही खूप शिकलो, खूप आनंदात दिवस घालवले. तुझ्या सहवासातल्या कित्येक गोष्टी कधीच विसरता येणार नाहीत. आम्ही पाची भावंडं, माझी भाची माधवी व तिचा नवरा विवेक यांनी अॅरेंज केलेल्या ट्रीपबरोबर अमेरिकेत होतो. आणि आम्ही नॅशनल पार्कमध्ये असताना फोन आला - 'माई गेली.' त्या वेळी सुलू शशीला म्हणाली, 'शशी, आज माईची पाच मुलं तिच्याजवळ नाहीत बघ.' शामाच्या मुलीच्या लग्नात आम्ही आठ बहिणींचा फोटो काढला होता. तो पाहिल्यावर आम्ही सर्वांनी त्याचं नाव ठेवलं- 'आई-माईच्या लेकी.' “माई, तुझ्या खूप आठवणी आहेत. तुझ्यावरसुद्धा एक पुस्तक होईल बघ!" अशा होत्या माई. पतीला जिवाभावाची साथ आणि मुला-नातवंडांना निरपेक्ष प्रेम देणाऱ्या घराला घरपण देणाऱ्या सगळ्या घाटगे परिवाराला मायेच्या पाशांनी एकत्र बांधून ठेवणाऱ्या. २६ मे १९४० रोजी घेतलेले 'नातिचरामि चे व्रत त्यांनी यजमान हयात असेपर्यंत, म्हणजे ३ सप्टेंबर १९८६ सालापर्यंत अगदी तनम पाळलेच आणि वसंतरावांच्या पश्चातही १९९९ 'स्वतः शेवटचा श्वास घेईस्तोवर, पतीच्या स्मृतीची साथसंगत साक्षी ठेवून, त्यांनी तेच व्रत तितक्याच आत्मीयतेने पाळले. नातिचरामि | १९७ ।