“माई कधीच रागवायची नाही; पण आमच्या बद्रीनाथच्या ट्रीपमध्ये तिला खूप चिडलेली आणि भ्यालेली मी पाहिलं आहे. तिचा त्या वेळचा तो चेहरा मला अजूनही आठवतो. वाटेत हरिद्वारला गंगास्नानाला जायचं ठरलं. माईबरोबर मी आणि नलू होतो. आमच्या आग्रहाखातर माई नदीच्या थोड्या आतल्या बाजूला यायला तयार झाली. पाण्याला खूप ओढ असल्याने तिथे थरायला साखळ्या होत्या. नलू अंघोळ करून वरच्या पायरीवर आली आणि मी मात्र थाइस करून एक पायरी खाली उतरले. मला काही जाणवायच्या आतच माझ्या दोन पायांतल्या परकरामध्ये पाण्याची ओढ एवढी वाढली, की मी पायरीवरचा पाय सुटून आडवी झाले. माझे साखळीचे हात सुटता सुटता माईच्या ते लक्षात आलं. ती लगेच पुढे झाली. माझे केस लांब होते व ते घट्ट पकडून तिने चपळाईने मला जवळ ओढलं. त्या वेळी ती खूप घाबरली होती व रागावलीही होती. ती कमी बोलायची; पण मी पाय टेकून उभी राहायच्या आत तिने आधी माझ्या तीन-चार मुस्काटीत मारल्या. नलूने चेष्टा केली. म्हणाली, 'प्रभे, माईने केस पकडले नसते, तर संध्याकाळी कलकत्त्याला पोचली असतीस!" प्रसंगाचे गांभीर्य त्या वेळी आम्हां दोघींच्याही लक्षात आलं नाही; पण माईने जेव्हा हा पराक्रम वसंतकाकांना सांगितला, तेव्हा लक्षात आलं, की खरंच केवळ माईच्या प्रसंगावधानाने आज मला जीवदान मिळालं. “जेव्हा घाटगे आणि पाटील यांच्यात वाटणी होण्याचा प्रसंग आला, तेव्हा माई आबासाहेबांना ( माझ्या सासऱ्यांना) भेटायला आली होती. तिने आबासाहेबांना सांगितलं, 'दोघेही तुमचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांचेही उद्योग उभारण्यात खूप योगदान आहे. तुम्हांलाही याची कल्पना आहे. आता हे (वसंतकाका) नाहीत, तेव्हा तुम्हांला एकच विनंती करायला आले आहे - माझ्या मुलांच्यावर अन्याय देऊ नका.' आणि म्हणूनच आबासाहेबांच्या सल्ल्याने न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासारख्या गृहस्थांची मध्यस्थी सर्वांनी मान्य केली. “माई बहुश्रुत तर होतीच, ती वाचायची पण खूप. आवाज छान होता, गाण्याची आवड होती. तिने गाणं शिकलेलं आठवत नाही; पण ती भजनं सुरेल म्हणायची. "आमच्या लग्नाला २५ वर्षं झाल्याची पार्टी माझ्या जावेकडे होती. माई आणि माझी सर्व भावंडं-वहिन्या वगैरे आल्या होत्या. कार्यक्रम खूपच रंगला होता. खूप जणांनी छान छान आठवणी सांगितल्या आणि वसंतवैभव । १९६ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२३०
Appearance