Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

As जडणघडण... प्रकरण १ जागतिकीकरणाच्या या जमान्यात वस्तूंचे, अभिरुचींचे आणि शहरांचेही एकजिनसीपण झपाट्याने उदयाला येत आहे. कोक अॅटलांटाप्रमाणेच अमरावतीमध्येही लोकप्रिय आहे आणि मर्सिडीज मोटारी स्टुटगार्टप्रमाणेच सुरतमथेही थावत असतात. हापूसचा आंबा खायला देवगडला जायला नको, दिल्लीतही तो मिळू शकतो. आमचे सिनेनट आणि गायक आता फक्त आमचे राहिलेले नाहीत; जगभर कुठेही त्यांचे चाहते दिसू शकतात. सगळ्याच शहरांत आज मल्टीप्लेक्स आहेत, मॉल्स आहेत, हायवे आहेत, ट्रॅफिक जॅम्स आहेत, फ्लॉवर शोज आहेत आणि पब्सदेखील आहेत; पण असे असतानाही खास कोल्हापूरची म्हणून काही वैशिष्ट्ये आजही जाणवतात. जडणघडण |२१|