Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नातिचरामि प्रकरण ७ वसंतरावांबद्दल लिहिताना त्यांच्या पत्नी प्रमिलाताई ऊर्फ माई यांच्याविषयी लिहिणे अपरिहार्य आहे. किंबहुना, त्याशिवाय वसंतरावांचे चित्रण पुरे होऊच शकत नाही. घाटगे कुटुंबाचे कुटुंबपण टिकवण्यात, घराचे घरपण टिकवण्यात माईंनी दिलेल्या योगदानाचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. "What happens at the breakfast table at home has a bearing on what happens at the conference table in the office असे कोणीतरी म्हटले आहे, ते बहुथा खरेच आहे. घरातले वातावरण जर निर्मळ असेल, तर त्याचा बाह्य जगातील आपल्या कामावर नक्कीच चांगला परिणाम होतो आणि याउलट घरी पत्नीशी वा मुलांशी भांडण झालेले असेल, तर त्याचा राग खूपदा ऑफिसात सहकाऱ्यांवर निघतो. तुम्ही जर राजकारणी किंवा उद्योजक असाल तर हे अधिकच खरे आहे. कारण कामाच्या निमित्ताने तुम्ही इतका वेळ घराबाहेर असता, आपल्या कामात इतके गढलेले असता, की खूपदा मुलांच्या तब्येती, त्यांचे अभ्यास, घरातील बारीकसारीक अडचणी, नातेवाईक, कौटुंबिक समारंभ नातिचरामि । १७९ ।