Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुष्पाताई दातार म्हणजे अमृतरावांच्या ज्येष्ठ कन्या. त्या बंगलोरमध्ये राहतात. पुष्पाताईंचे पती अनंतराव आयएएस होते. त्या म्हणतात, “प्रथम अनंत पुण्यात होते. नंतर थारवाडला कलेक्टर होते. त्या वेळीही त्यांचा वसंतकाकांशी संबंध येत असे. नंतर ते दिल्लीला कॉमर्स मिनिस्ट्रीत होते. तिथेही वसंतकाका त्यांच्याकडे अधूनमधून जात असत. कथी व्यावसायिक कामासाठी, तर कधी सहज गप्पा मारायला म्हणून. चिकमंगळूरलाही ते होते. वसंतकाकांची मोठी सून नंदिनी तिथलीच आहे. १९८७ ते १९८९ ते कर्नाटक राज्याचे मुख्य सचिवही होते. " पुष्पाताई स्वतः सिंडिकेट बँकेत अधिकारी होत्या आणि तिथे वीस वर्षे नोकरी केल्यावर आता निवृत्त जीवन कंठत आहेत. आपल्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणतात, “थारवाडला कर्नाटक कॉलेजात मी सायन्सला प्रवेश घेतला, तेव्हा वसंतकाकांनी मला एक सायकल भेट दिली होती. त्या काळी मुली सायकली क्वचितच चालवत. विशेषतः धारवाडमध्ये. साहजिकच त्या सायकलचा मला अगदी अभिमान वाटला होता. सुट्टीत मी आवर्जून कोल्हापुरात येत असे. पुढे लग्नानंतर अनंतचं पोस्टिंग रोममध्ये झालं. तेथील भारतीय दूतावासात अॅटेची म्हणून. विदेशी जाणारी मी पहिली घाटगेकन्या, वसंतरावांना त्याचं भलतंच कौतुक वाटलं होतं. त्या वेळी मला सोडायला ते विमानतळावर आले होते. " पुष्पाताईंच्या तोंडून त्यांच्या लग्नाची कहाणी ऐकायला मिळाली आणि त्यातूनही वसंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर बराच प्रकाश पडतो. पुष्पाताईंचे अनंत दातार यांच्याबरोबर लग्न ठरले. ही घटना नोव्हेंबर १९५६ ची. त्या वेळी वडील अमृतराव मोहेंजोदारोशी संबंधित एका संशोधनपर प्रकल्पासाठी अमेरिकेत होते. त्यासाठी त्यांना दीड वर्षाची शिष्यवृत्ती मिळाली होती व ते काम मध्येच सोडून मुलीच्या लग्नासाठी म्हणून लौकर भारतात परत येणे त्यांना शक्य नव्हते. अनंतचे वडील बळवंतराव दातार म्हणजे बेळगावच्या सुप्रसिद्ध दातार कुटुंबातील. ते घरातील इतर सर्वांप्रमाणे उत्तम वकील होतेच; पण शिवाय राजकारणातही होते. गोविंद वल्लभ पंत केंद्रात गृहमंत्री असताना बळवंतराव त्यांचे उपमंत्री होते. बळवंतरावांना मुलाचे लग्न लवकर करायचे होते, कारण फेब्रुवारी १९५७ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक वसंतवैभव | १५४ ।