Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९९१ रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई. ज्योत्स्ना, अनंत, रजनी, ललिता, कांचन आणि माधव अशी त्यांना एकूण सहा मुले. त्यांच्या एक कन्या रजनी घाटगे पूर्वी बंगलोर येथील अशोका ह्या पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलात नोकरी करत होत्या आणि सध्या त्या बंगलोरमधील हॉटेल व्यवसायासाठी सल्लागार म्हणून काम करतात. त्या म्हणत होत्या, “माथवरावांच्या घरातील वातावरण सनातनी होतं. घरी नवरात्र वगैरे सगळे सण यथास्थित साजरे होत. रोज शाळीग्रामाची पूजा होई; पण पुढे जर्मनीत गेल्यावर विष्णुपंतांना मात्र अगदी वेगळ्या संस्कृतीत राहावं लागलं. ते शिकत असताना एकदा तर तिथल्या विद्यापीठातील रिवाजांप्रमाणे त्यांना दुसऱ्या एका सहाध्यायाशी द्वंद्वयुद्धही खेळायला लागलं होतं! योगशास्त्राची आणि फिजिक्सची त्यांना सारखीच आवड होती. अशा विविध संस्कारांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्यांना अनेक क्षेत्रांत उत्तम गती होती. ते संस्कृतचेही पंडित होते व विमानांचेही उत्तम डिझायनर होते. पब्लिक सेक्टरप्रमाणे खासगी उद्योगक्षेत्राचंही त्यांना ज्ञान होतं. रवी किर्लोस्कर आणि शंतनुराव किर्लोस्कर यांचे ते निकटचे मित्र. त्यांच्या कंपन्यांच्या बोर्डावर विष्णुपंत कायम असत. विशेष म्हणजे ते गोल्फ खेळण्यातही खूप प्रवीण होते. बंगलोर गोल्फ क्लब त्यांनीच सुरू केला. क्लबच्या गोल्फ टीमचे ते १९५७ साली कॅप्टन होते. पुढे कर्नाटका गोल्फ क्लबदेखील त्यांनीच सुरू केला व त्या क्लबचे ते पहिले अध्यक्ष होते. पण खूपदा गोल्फ खेळतानाही ते लिंग्विस्टिक्सची चर्चा करत!" त्यानंतरचे वसंतरावांचे भाऊ म्हणजे सखारामपंत ऊर्फ तात्या; त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे. त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला त्या काळी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुरू झाले नव्हते; त्यामुळे सखारामपंतांनी कराचीच्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घेतला होता. पण वर्षभराने पुण्यातील कॉलेज सुरू झाल्यावर ते पुण्याला आले व तिथूनच सिव्हिल इंजिनिअर बनले. अनुभव मिळावा म्हणून दोन-चार वर्षे त्यांनी नोकरी केली. कोल्हापुरात छत्रपती बांधत असलेल्या राधानगरी धरणाच्या कामावरही त्यांनी एक-दोन वर्षे काम केले होते. त्यांच्या पत्नी वसंतवैभव | १४४ ।