पान:वय माझे पाच हजार.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जन्म

लहानपणी भयंकर कुतूहल मूल कसं जन्मतं का जन्मतं कुठून येतं कोण पाठवतं वय वर्षे बारा, काहीच नव्हतं कळतं सर्वांचं उत्तर एकच... देव पाठवतो

आता मोठा झालो मिसरूड फुटलं

आणि तसचं काहीसं वाटू लागलं मन विस्कटलं, बेचैन झालं, धुंदही झालं काहीच कळेना, असं एकाएकी का झालं मन, छाती, धडधडणारं हृदय, सारं अगदी गळ्यापर्यंत भरून आलं कळेना मन बेकाबू का उधाणलं  दाराची कडी न वाजवताच म्हणालीस, राजा येऊ का रे... ...आणि कवितेचा जन्म झाला! ८/ वय माझे पाच हजार