पान:वय माझे पाच हजार.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनोगत...

 वास्तविक मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी. काव्य हा काही माझा प्रांत नव्हे. पण मनाच्या प्रचंड एकाग्रतेत, कधी जिव्हारी लागणारे, कधी मानवतेलाच हादरवून सोडणारे तरकधी मानवतेला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवणारे प्रसंगक्षणात मनाचं समुद्र मंथन करून आपसूकच लेखणीत प्राण ओततात.  आयुष्यात मला यशस्वी करणारे प्रसंग जसे घडले, तसेचमनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारे, खोलवर रुतणारेहीघडले! काव्य मला मनाच्या अगदी खोलवर, तळात एखाद्यास्वच्छ स्वप्नासारखं दिसतं. बऱ्याच वेळा रात्री-अपरात्रीच तेअलगद मनातून पानांत उतरतं!जसं दिसलं, सुचलं तसं मी रेखाटलं! एखाद्या लहानमुलानं काढलेल्या चित्राचं, त्यातल्या रांगडेपणाचं आपल्यालाकौतुक नाही का वाटत? अगदी तसं! चित्रकलेच्या निकषावरकदाचित ते उतरत नसेल पण त्याला जसे वाटलं तसं ते मनस्वी एकाग्रतेनं, रंग भरलेलं असतं.सुदैवानं महेश कराडकर यांच्या सारख्या माझ्यावर नियाज प्रेम करणाऱ्या कवीला हे माझं काव्य प्रकाशितकरावं वाटलं. त्यांनीच त्याला अंगडं टोपडं घालून, तीट लावून तुमच्या पुढं ठेवलं! मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे!तुम्हा वाचकांना पण आवडेल अशी आशा करतो. - अनिल नारायण कुलकर्णी