Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ती आज असती तर...

  आयुष्य जगताना बरेच क्षण साधायचे अगदी तीव्रतेने ठरवूनही सुटून जातात. आणि मग असे काही अघटित घडते की सुटलेले ते क्षण अत्यंत खिन्नपणे आठवण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही. माझी अतिशय सुशील, नम्र, अगत्यशील जीवनसखी मंगल साऱ्यांनाच चटका लावून अर्ध्या वाटेवरून माझी सोबत सोडून माझ्या वाट्याला ते सारे अपुरे क्षण तसेच ठेऊन कायमची निघून गेली!
 हा सारा लेखन प्रपंच तिच्यासाठी....