पान:वनस्पतीविचार.djvu/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतिविचार. [प्रकरण mon virnww-- wwwwwwwwwwwwwwwwww पानावरील केस कधी कधी एकपेशीमय अथवा बहुपेशीमय आढळतात. त्यांच्या आरुतीप्रमाणे त्यास निरनिराळे स्वरूप प्राप्त होते. साधारणपणे केंस वनस्पतीच्या सर्व भागांत आढळतात. फुलांतील नाजुक परागवाहिनीवर ( Style ) सुद्धां केस येतात. असल्या केसांची गर्भधारणक्रियेत .अप्रत्यक्ष मदत होते. परागवाहिनीवरलि केसास परागकण एकदा चिकटले असतां निघन जाणे शक्य नसते. परागकणाची गर्भसंस्थापनेस प्रत्यक्ष जरूरी असल्यामुळे ह्या केसाकडून त्या क्रियेत अप्रत्यक्ष मदत केल्यासारखी असते, नाहीतर गर्भधारणा मागे पडली असती. कोवळा माग उन्हाच्या अथवा थंडीच्या कडाक्याने करपून जाण्याचा संभव असल्यामुळे कोवळ्या भागांवर केस नेहमी येतात, व त्यामुळे त्याचें संरक्षण होतें. केंस जेव्हां जास्त कठीण व अणकुचिदार होतात, त्या वेळेस त्यास कांट्यासारखे रूप येते. गुलाबावरील कांटे अशा त-हेचे बाह्य त्वचेवरील कठीण झालेले केस होत. असल्या केसांचा अथवा कांट्याचा अंतर्भाव संरक्षक पेशीजाल रचनेत होतो. ह्या काट्यांस त्वक्कंटक हे नांव आहे. ह्यांचा उल्लेख पूर्वी केलाच आहे. साल (Cortex):-बाह्यत्वचेच्या नंतर आतील बाजूस साल सुरू होते. येथील पेशी मृदु व दीर्घ असतात. पेशीमध्ये पोकळ्यांचा भरणा येथें विशेष असतो. पेशीच्या भित्तिका पातळ किंवा जाड असतात. त्यांची रचना अवयवा प्रमाणे कमी अधिक जाडीची असते. कोवळे खोंड, पाने, उपपुष्प, पत्रे वगैरेमध्ये रंजित शरीरें ( chloroplasts ) पुष्कळ आढळतात. पानांत बहुतेक त्यांचा भरणा असतो. दुग्धरसवाहिन्या, व पेशीमध्यनलिका सालीत आढळतात. पुष्कळ वेळां मृदुजाल व साल ही दोन्ही समानार्थी उपयोग करितात. सालीत स्थानमिन्नत्वामुळे दोन प्रकारची जालें असतात, १ स्तंभबाह्य ( Extrastelar ). व २ स्तंभांतरगत (Intrastelar). स्तंभाचे बाहेरील अंगास असणारे जाल स्तंभवाद्य व स्तंभांत असणारे जाल स्तंभांतरगत होत. स्तंभवायांत (Exodermis) अंतरालत्वचा व अंतरत्वचा (endodermis) असे दोन भिन्न पदर आढळतात. अंतरत्वचा (endodermis).