पान:वनस्पतीविचार.djvu/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वें.]. पेशीजाल ( Tissue). हरित वर्ण शरीरें (Chloroplasts) बहुतकरून नसतात. परंतु काही पाण्यांत उगवणान्या वनस्पतीमध्ये, बाह्यत्वचेमध्येसुद्धा ती असतात. तसेच त्वचारं| (Sto mata) जेव्हां तयार होतात, त्या वेळेस द्वाररक्षकपेशी ( Guard-cell) म्हणून रंध्राजवळ असतात, त्यामध्ये हरित वर्ण शरीरे असतात. संरक्षक पेशीजालरचनेचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्वचा-रā होत. त्वचारंधा ( Stomata) चा अंतरपोकळ्याशी संबंध असल्यामुळे, त्या द्वारे आंतील हवा व बाहेरील हवा, त्यांचा परस्पर संबंध राहतो. त्वचा-रā वनस्पतींच्या जीवनकार्यात फारच उपयोगी पडतात. , बाह्यत्वचेमध्ये एका पेशीचे विभाग होऊन मध्य पडदा जाड होतो. पुढे तो आपोआप फाटून मध्ये लहान पोकळी राहते. ही पोकळी अथवा द्वार म्हणजे त्वचारंध्र (Stoma) होय. विभागलेल्या पेशीचा आकार अर्धचंद्राकति असतो. त्यांत हरितवर्ण तसेंच जीवनकण, केंद्र वगैरे स्पष्ट असतात. जरी मध्ये द्वार तयार होते, तथापि त्या दोन्ही पेशीचा संबंध टोंकांकडे राहतो. त्या पेशीव्यास द्वाररक्षक (Guard-cell ) हे नांव योग्य आहे. द्वाररक्षक पेशी व त्वचेंतील इतर पेशी त्यांत पुष्कळ फरक असतो. बाजूच्या पेशींत केंद्र, जीवन कण, साधारण असून त्यांत द्वाररक्षक पेशीमध्ये आढळणारी हरित्वर्ण शरीरें असत नाहीत. जेव्हां पाणी ह्या पेशीद्वारांत भरूं लागते त्यावेळेस त्यांची अर्धचंद्रारुति जाऊन त्या जागी वर्तुलारुति येते, व जसे जसे पाणी अधिक शिरतें तसे तसे त्यांमधील द्वार अथवा रंध्र जास्त रुंद अगर मोठे होते. त्याचप्रमाणे उलट पाणी जेव्हां कमी असते त्या वेळेस तें रंध्र संकुचित होतें. न रुंद होणे अथवा संकुचित होणे ह्याचा परिणाम झाडाच्या बाष्पीभवनावर (Transpiration) होतो. ह्या विषयी आपण अधिक विचार पुढे करूं. - वनस्पतीच्या शरीरांवर येणान्या केसांचा उगम बाह्यत्वचेपासून असतो. बाह्यत्वचेची एखादी पेशी बाह्यांगाप्त अधिक वाढून केंस तयार होतो. केंस एक पेशीमय अथवा बहुपेशीमय असतात. मुळ्यावरील केस नेहमी एक पेशीमय असून त्याचे काम फार महत्त्वाचे असते. जमिनीतील निरािंद्रिय द्रव्ये शोषण करण्याचे काम मुळ्यावरील केसांतून होत असते. खोडावरील अथवा