पान:वनस्पतीविचार.djvu/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें]. qof Leaf. annannnnnnnnnnnn उपपणे लहान असून फार दिवस पानांचे बुडी राहत नाहीत. लाख, वाटाणे वगैरेमध्ये उपपणे मोठी असल्यामुळे ती मुख्य पानें अगर पत्रे आहेत असा चुकीचा समज होण्याचा संभव आहे. गुलाबांत, पानांचे बुडौं ती दोन्ही बाजूस चिकटलेली असतात. वुइलो, छतावर, तगर वगैरेमध्ये पानांचे देठावर उपपणे येतात. कुट ( Buckwheat ) नांवाची वनस्पति उत्तर-हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणी आढळते. तिच्या फळांतील बीजें दळून त्या पिठाचा उपयोग भाविक लोक एकादर्शाचे दिवशी अगर उपवासाचे दिवशी करितात. येथें पानांचे बुडाशी उपपणे वाढून देंठाभोंवती गुंडाळतात. ह्या उपपर्णात हरितवर्ण पदार्थ (Chlorophyll ) नसतो. अशा प्रकारची खोडाभोवती गुंडाळलेली उपपर्णे रेवाचिनीमध्ये आढळतात. बाभूळ, वाघाटी, इंगाडारसिस् वगैरेमध्ये कांटेरी उपपणे असतात. मंजिष्ठ, कॉफी, आयक्झोरा वगैरेमध्ये पाने समोरासमोर असून उपपणे पानांचे पोटाकडील बाजूस येतात. दोन्ही उपपणे एकमेकांस चिकटून, एकच उपपर्ण आहे असे वाटते. स्मायलॅक्समध्ये उपपणे लांब मुतासारखी असून, त्यांचा दोरीप्रमाणे वेलास वर चढण्यास उपयोग होतो. सोनचाफा, अंजीर, वड, पिंपळ इत्यादि झाडांमध्ये उपपर्णीचा उपयोग कळ्यांभोवती संरक्षक आवरणासारखा होतो. । पाने चांगली फुटली म्हणजे काही उपपणे गळू लागतात. तसेच काही पानांबरोबर पुष्कळ दिवस टिकतात. जसें गुलाब, बेरी, स्ट्रॉबेरी, वाटाणे वगैरे. उपण एकदल धान्य वनस्पतींमध्ये कधी आढळत नाहीत. विशेषेकरून द्विदलधान्य वनस्पतीमध्ये पानांचे बुडाशी ती आढळतात. विशिष्ट वनस्पतीमध्ये ती विशिष्ट रीतीने उपयोगी पडतात ही गोष्ट खरी; तथापि त्यांचा सार्वत्रिक उपयोग आहे असे म्हणता येणार नाही. ___देठः-सर्वच झाडांच्या पानांस देंठ असत नाही, पण आंबा, फणस, उंबर, पंपळ वगैरेमध्ये तो असतो. साधारणपणे देठाचा आकार वाटोळा असतो. ऊस, वेळू, दूर्वा वगैरे तृणवनस्पतीत देंठाचा आकार तरवारीच्या म्यानासारखा असून तो खोडाभोवती गुंडाळतो. म्हणजे येथे पानाचें बूड व दें दोन्ही म्यानासारखी होतात. जेथून खरे पत्र सुरू होते, त्या ठिकाणी पातळ माशीच्या पंखाप्रमाणे पांढरा पापुद्रा असून त्यावर कधी कधी केस येतात. लिंबू, नारिंग, चकोत्रा वगैरे पानांच्या देठावर दोन्ही बाजूंस दोन पक्ष वाढतात. काहीं अकॅशिमामध्ये