पान:वनस्पतीविचार.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतिविचार. [प्रकरण amarmarnamakranaaraamanarar पुष्कळ दिवस टिकल्यामुळे वनस्पती नेहमी हिरवीगार राहते. म्हणजे पानांचा नियम सार्वत्रिक सारखा आहे असे नाही. झाडांच्या गुणधर्मावर, तसेच त्यांच्या परिस्थितीवर पाने राहणे अगर गळून जाणे अवलंबून असते. खरोखर वनस्पतींचा जातिस्वभाव ह्या ठिकाणी प्रधान असतो. स्वरूपः-कळीमध्ये पाने एकवटून संकुचित स्थितीत असतात. जशी जशी कळी उमलूं लागते, तशी तशी पाने खाली सुटू लागतात. नवीन पानांचा भरणा आपोआप आंतून तयार होत असतो. पानांची वाढ प्रथम अग्राकडे दृष्टीस पडते. नंतर पानांचे बूड वाढते. वाढतां वाढतां पानास कायमचें स्वरूप प्राप्त होते. भागः-पानाचे मुख्य तीन भाग आहेत. [१] बूड. [२] देंट. (Petiole) व [३] पत्र (Lamina) ह्या तिन्ही भागांमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे पत्र होय. ह्याचीच वाढ विशेषेकरून जास्त होते. कधी कधी पत्रास कांद्या येऊन त्यावर उपपत्रं येतात. पानाचे बूड:--खोडावर अथवा फांदीवर ज्या ठिकाणी पान चिकटते त्या पानाच्या भागास बूड समजावे. कांहीं पानांत हा भाग चांगला स्पष्ट असून त्या ठिकाणी थोडा फुगवटा. ( Pulvinus ) आला असतो. जसे, आंबा, वाहवा, वगैरे. काही ठिकाणी हा फुगवटा न वाढतां, पानाचे बूड म्यानासारखें वाढन खोडासभोवती गुंडाळते. तृणधान्यवनस्पतीमध्ये ह्या प्रकारची पाने नेहमी आढळतात. जसें ऊंस, गहूं, बाजरी, वांबू वगैरे. सुपारी किंवा ट्रॅडसकॅनसिया वनस्पतीमध्ये पानाचे बूड खोडाभोवती गुंडाळलेले असून तृण धान्य वनस्पतीमधील पानाप्रमाणे सोडवितां येत नाही. बुडाची जणू एक नळी बनली असून त्यांतून खोड वाढला आहे असे वाटते. बालकंद म्हणून एक हिरवळ तंबाक सारखा लहान रोपा आहे. त्यामध्ये पानांचे बुडापासून दोन शेपट्या खोडावर चिकटून जातात. बालकंदाप्रमाणे थिसल नांवाच्या कांटे-या वनस्पतींत ह्याच प्रकारे पानाचें बूड असते. उपपर्णे (Stipules:)-पानांचे बुडाशी कधी कधी एक अथवा दोन उपांगे आढळतात. उपांगांत पानांप्रमाणे हरितवर्ण पदार्थ असतो. पानांच्या उपांगांस ' उपपर्णे ' (Stipules) म्हणतात. सिसम, मसूर, हरभरे वगैरेमध्ये