पान:वनस्पतीविचार.djvu/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ . वनस्पतीविचार. [प्रकरण नसून ते जमीनीतून वर येतांना जणू दोन चार झाले आहेत असे वाटतात. ही झाडे सुद्धां बरीच वर्षे टिकतात, पण वृक्षा इतकी जुनी राहत नाहीत. अशास : झुडे' (shrub) म्हणणे बरे दिसते. यापेक्षा लहान झाडास झुडुप (bush) म्हणावें. जसे तुळशी, धोत्रे, कापूस वगैरे.. वरील तिन्ही प्रकारच्या खोडांपेक्षा टणकपणा कमी असून, लवचीक जास्त असणारे खोड जाई, द्राक्षे, वगैरेमध्ये आढळते. हे खोड अधीक हिरवट असते. पालक, शाकभाज्या, हरभरे, मूग, इत्यादिकांची खोडे ह्याच वर्गात पडतात. असल्या वनस्पतीस 'रोपडी' (herb) हे नाव साजेलसें वाटते. कांहीं रोपडी पांच सहा वर्षे टिकून प्रतिवर्षी त्यास फुले येतात, पण काही जास्त दिवस न टिकता एका ऋतूंमध्ये त्यांची उत्पत्ती, पोषण व मरण, ही तिन्ही संपतात. म्हणजे बीजापसून वनस्पति उगवून वाढू लागतात, पुढे त्यास फुलें व फळे येऊन वाळतात, आणि एका ऋतूंत त्यांचा जीवनक्रम सर्व आटोपतो. म्हणून त्यास वर्षायु (annual) ह्मणतात. - कांदे, लसूण, मुळे, गाजर, चुकंदर वगैरेमध्ये खोड द्विवर्षायु (biennial) असते. म्हणजे ते दोन ऋतू अगर दोन वर्षे टिकतें. पहिले वर्षी फुलें अथवा फळे त्यावर न येतां मुळ्या, व पाने चांगली पुष्ट होतात. ऋतूचे अखेरीस पाने व हवेमध्ये वाढणारा कोंब वाळून जातात. दुसरे ऋतूंमध्ये पुनः नवीन कोंब वाढून पाने वगैरे येऊ लागतात. शेवटी फुले व फळे तयार होतात. फुले व फळे येण्यास दोन ऋतू लागतात, म्हणून असल्या वनस्पतीस द्विवर्षायु ( biennial ) म्हणण्याची चाल आहे. काही वेळां द्विवर्षायू म्हणून मोडिल्या जाणा-या वनस्पति एकाच ऋतंत आपला जीवनक्रम संपवितात. अशा वेळी त्या द्विवर्षायु न राहतां वार्षिक होतात. विशेषे करून उष्णप्रदेशांत द्विवर्षीय वनस्पति कमी असतात; अथवा द्विवर्षायु बहुधां वार्षिक होतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. . . 7 दोन ऋतूंपेक्षा जास्त दिवस टिकणाऱ्या वनस्पतीस 'बहुवर्षायु ' (perennial) म्हणतात. कारण दरवर्षी त्यास फुले व फळे येतात. वर्षायु अथवा द्विवर्षायु वनस्पतींस एकदां फुले व फळे आली असता ती नेहमी वाळन जातात. म्हणजे फुले व फळे येणे हे त्यांच्या मृत्यूचे लक्षण आहे. पण