Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें.]. स्कंद अगर खोड Stem. २७ जाऊन त्यापासून तयार होणाऱ्या फांद्या पानाचे पोटाचे बाहेर आल्या आहेत असें वाटण्याचा संभव आहे. ru ( आगंतुक कळ्याः -ह्या ठिकाणी अस्थानोद्भूत ( adventitious) कळ्यांचा निर्देश करणे जरूर आहे. कारण भुगारे किंवा कळ्या म्हणजे मुग्ध दशेत असणाऱ्या फांद्या होत. म्हणूनच अस्थानोद्भूतकळ्या ह्या अस्थानोद्भूत फांद्या आहेत. site शिसू वगैरे झाडांत मुळ्यावर कळ्या वाढून त्यांच्या फांद्या बनतात. शिस् झाड मुळापर्यंत कापून टाकिलें व केवळ मुळे जरी सोडली, तथापि मुळावर कळ्या वाढून ते झाड पूर्ववत् वाढते. खरोखर मुळ्यांचा धर्म कळ्या उत्पन्न करणे हा नाही. ते काम खोडाने करावे असा साधारण नियम असून असले अपवाद कधी कधी दृष्टीस पडतात... ह्याच प्रकारे गुलाबवर्गाच्या झाडामध्ये मुळ्यापासून अस्थानोद्भूत कळ्या उत्पन्न होऊन त्यांच्या फांद्या बनतात. कळ्यांची उत्पत्ति मुळ्याप्रमाणे मांत खोल होऊन, मुळ्यांचे अंग फोडून त्या बाहेर येतात. - तसेंच झाडावरील फांद्या, डहाळ्या व पाने कापून केवळ झाडाचा उभा सोंट ठेविला असतां एखादे वेळेस सोंटावर गवीन कळ्या उत्पन्न होतात. ह्या कळ्यांसही अस्थानोद्भूत म्हणण्यास हरकत नाही. बलाबलताः-वनस्पतींच्या बलाबलतेप्रमाणे त्यांची खोडे लहान मोठी होतात. काहींचे खोड मजबूत असून सरळ उभे राहतात. जसे कापूस, मोठी झाडें, तूर इत्यादि. काहींचे खोड मजबूत व टणक नसल्यामुळे जमीनीवर पसरतात. जसें रताळी, खरबूज वगैरे. कित्येक निर्बल वनस्पति दुसन्या झांडांचा अथवा भिंतीचा आश्रय घेऊन वर चढतात. काही ठिकाणी वर चढण्याकरितां तंतूसारखे धागे असतात, पण काही खोड स्वतः आश्रयाभोवती विळखेकरून वर जातात. तंतूमय धागे अशा ठिकाणी येत नाहीत. आंबा, फणस, पिंपळ वगैरेमध्ये खोड मजबूत असून दरवर्षी थोडा थोडा मोठा होत असतो. शिवाय ही झाडे पुष्कळ वर्षे टिकून प्रतिवर्षी योग्य ऋतूंत त्यास फुले व फळे येतात. अशा मोठ्या झाडास 'वृक्ष' (tree) ही संज्ञा योग्य आहे. साखरलिंबु, करवंदी, तोरणी, कांटे-या बोरी, वगैरेचे खोड इतके मोठे