Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें]. स्कंद अगर खोड Stem. तरतात. वुइलो ओढ्याचे कांठावर उगवतो. त्याची मुख्य मुळे जमिनीत जातात, पण दुसरी आगंतुक मुळे बाजूला निघून ती पाण्यांत वाहती राहतात. पाण्यांत चाहती राहल्यामुळे त्यांची एक जणूं जाळी बनते. नवीन कालवा जेव्हां एखादे जागेतून जातो, त्यावेळेस शेजारच्या जमिनीत उगवणाऱ्या झाडाची मुळे कालव्याचे पाण्याकडे धाव घेतात, व त्यांची वाढ त्या दिशेत फार जोमाची होते. वुइलो वगैरेची मुळे जर एकदां पाण्याचे नळीत घुसली तर ती इतकी वाढतात की, त्या योगाने नळीचे तोंड बंद होऊन, नळीतून वाहणारा पाण्याचा प्रवाह बंद होतो. पाण्याचे नळ नेहमी ओढयांतून, कालव्यांतून पाणी नेण्याकरिता बसविले असतात व कांठावर उगवणा-या झाडांची मुळे त्यांत शिरतात. पाण्यातील मुळे लांकडासारखी कठीण होत नाहीत. पाणी वाहते असेल तर प्रवाहा. बरोबर मुळे वाहती राहतात. बीजजनन होत असतां आदिमूळ अगोदर बाहेर पडून जमिनीत घुसते, याचे कारण मुळास बळकटी व अन्न देण्याचे काम करावयाचे असते. उगवतें बीज एका जागी मजबूत राहिले नाही, तर वान्यामुळे अथवा इतर कारणांनी इकडे तिकडे जाऊन रोपा कायमचा मजबूत होणार नाही. म्हणून मुळे प्रथम वाढून जमिनीत चांगली घुसतात, व त्यायोगे आपली दोन्ही काय चांगल्या -रीतीने घडवून आणितात, प्रकरण ५ वें. . ... स्कंद अगर खोड Stem मूळ व स्कंद:-वीजांतून वर उगवणारा कोंब हा प्रथम खोड होय. साधारण नियम असा आहे की, मुळ्या जमिनीत शिरून खोड हवेत वाढते. हा नियम सार्वत्रिक लागु पडतो असें नाही. मुळ्यांवर पाने कधी येत नाहीत, तसेंच पानाप्रमाणे अथवा कोवळ्या खोडाप्रमाणे मुळ्यांत हरित्वर्णपदार्थ Chlorophyll नसतो, सूर्यप्रकाश टाळून जमिनीत घुसणे हा मुळ्यांचा