पान:वनस्पतीविचार.djvu/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वनस्पतिविचार. [प्रकरण सेथेच कायमचे बि-हाड देण्याचे ठरवितो, व हळु हळु आपला संसार थाटवू लागतो. एकंदर संसार थाटविल्यावर यजमानास त्यास घालवून देण्याची ताकद नसते व निमूटपणे त्याचा खर्च चालविणे भाग पडते. याप्रमाणे लवकरच यजमानाचे डोक्यावर हात फिरवून तो त्याचे वाटोळे करून टाकितो. "भटास दिली ओसरी व भट हातपाय पसरी' ह्या म्हणीची सत्यता अशा ठिकाणी चांगली दिसून येते. तांबोरा, काजळी, बुरा इत्यादि रोग ह्याच जातीचे आहेत. तांबोरा एकदां गव्हावर पडला म्हणजे तो नाहीसा करणे हे जवळ जवळ अशक्यच आहे. आजपर्यंत शेंकडों प्रयत्न झाले पण हा रोग नाहीसा करण्याचा रामबाण उपाय अजून निघाला नाही. बिलकूल संबंध नसतां शक्य तेवढी काळजी घेत असतां ह्या रोगाचा प्रादुर्भाव एकाएकी कसा होतो, हा मोठा चमत्कार आहे. - खरोखर जगन्नियंत्याची नानात-हेच्या जीवांची परंपरा राखण्याची तन्हा फारच विलक्षण व अगाध आहे. एकाचा नाश तर दुसऱ्याचा उदय, एक तरतो तर दुसरा मरतो. सारांश ह्या जीवनकलहांत ईश्वराच्या करणीचे जितकें कौतुक करावे तितकें थोडेच आहे.. - भूछत्रे घाण व कुजलेल्या जागेवर उगवतात व मतसेंद्रिय पदार्थ मुळांतून शोषण करून घेतात. कुजट घाण नाहीशी होऊन प्राणिवर्गाचे आरोग्यावर त्यामुळे चांगला परिणाम होतो. हरितवर्णपदार्थ (Chloroapyil) त्याचे शरीरांत नसल्यामुळे त्यास कार्बन आम्ल हवेमधून शोषण करितां येत नाही, व त्यामुळे सोंद्य पदार्थ नवीन करितां येत नाहीत. म्हणून आयत्या तयार असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांची त्यास जरूरी असते. पाण-वनस्पतीची मुळे तंतूसारखी असतात. ती चिखलांत रुतून तेथूनच अन्नशोषण करितात. पाणमुळ्यांवर कोणतेही आवरण असत नाही व आवरणाची जरूरी नसते. कारण जमिनीत घुसणाऱ्या मुळ्यांप्रमाणे त्यांचा संबंध कठीण सक्तपदार्थाशी येत नसतो. शिंगाडा ही एक पाणवनस्पति आहे. त्याच्या मुळ्या एका जागी येतात असे नाही. प्रत्येक काड्यांपासून मुळ्या सुटून पुंजके बनतात. ह्या सर्व मुळ्या चिखलापर्यंत गेल्या नसतात. काही चिखलांत शिरून बाकी पाण्यांत लोंबत्या राहतात. कांहीं लोकांनी ह्या मुळ्यांच्या पुंजक्यास विशिष्ट पाने आहेत असे म्हटले आहे. कमळाची मुळे शिंगाड्याप्रमाणे काही चिखलात राहतात, व काही पाण्यांत