पान:वनस्पतीविचार.djvu/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतीविचार. [प्रकरण marrrrrrrrrrrrrrrrrm अन्नाचा उपयोग आपणाकडे करितो, त्यामुळे वनस्पतींची मेहनत व दूरदर्शीपणा ही दोन्ही व्यर्थ होतात. मुळे हीच केवळ अन्नाची कोठारे नसून वनस्पतीची इतर अवयवें सुद्धा ह्या कामाकरितां उपयोगी पडतात. खोड, पाने, फळे, अगर बीजें, ह्या सर्वांमध्ये मुळाप्रमाणेच अन्नसाठा केला असतो. : .. । आगंतुक मुळ्यांचे वेगवेगळे प्रकार असून त्यांचा उपयोग निरनिराळा असतो. आयव्ही अथवा बिग्नोनिचा, हे वेलवर्गापैकी आहेत. त्यांचा धर्म भिंतीचा अथवा दुसरे वनस्पतीचा आश्रय घेऊन वर चढण्याचा असतो. चढण्यास सुलभ पडावे म्हणून कांड्यापाशी जागजागी आगंतुकमुळे फुटून ती भिंतीत अथवा आश्रयाचे जागी घुसतात. असल्या आगंतुक मुळ्यांचा चढण्याकडे चांगला उपयोग होतो. पिंपळीचा वेल भिंतीवर चढतो; ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची आगंतुकमुळे फुटतात. जरी असल्या मुळांचा उपयोग नेहमी वर चढण्यास होतो, तथापि प्रसंगी त्याचेकडून अन्नद्रव्ये शोषण केली जातात. हवेत लोंबणारी मुळे ( Aerial roots):-वडाच्या पारंब्या जमिनीकडे लोंबत असलेल्या नेहमी आढळतात. पारंब्या म्हणजे फांद्यांपासून निघणारी आगंतुक मुळे होत. ही मुळे हवेत लोंचती राहिल्याकारणाने त्यांस पवनोपजीवी म्हणतात. पारंब्या जमिनीत घुसून वडाचे झाडास चांगली मजबुती मिळते. दरवेळेस पारंब्या जमिनीत घुसल्यावर तो वृक्ष मोठा घनछायेचा होतो. श्रीमंत पहिले बाजीरावसाहेब एकदां उत्तर-हिंदुस्थानांत स्वारी करण्यास निघाले असतां वाटेत त्यांचा तळ नर्मदातीरी पडला. आख्यायिका अशी आहे की, स्वारीत लवाजमा व सरंजाम एका वटवृक्षाखाली राहिला, त्यावरून तो वृक्ष किती विस्तृत असावा ह्याची कल्पना सहज करितां येईल. ऊस, केवडा, जोंधळा, पिंपरणी, नांद्रुक, आर्किड वगैरेमध्ये असली आगंतुक मळे आढळतात. असल्या मुळावर बारिक केस येत नाहीत. कारण ह्यांचा उपयोग अन्नशोषणाकडे क्वचित होतो. ज्या मुळांवर केस येतात ती कोरड्या हवेत पांढुरकी होतात व दमट हवेत हिरवळतात. अथवा कधी कधी. तांबूस पिंगट बनतात. परानभक्षक (Parasitic) मूळे:-आगंतुक मुळ्यांचा दुसरा एक प्रकार आढळतो. त्यासे परान्नमक्षक मुळे म्हणतात. जसें बांडगूळ, अमरवेल वगैरे. अमर,