पान:वनस्पतीविचार.djvu/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- मूळ Root, wwwwwwwwwwww wwwwwwwwwwwwwwwwww ami अशा आगंतुक मुळांस 'अस्थानोद्भूत ' ( Adventitious ) मुळे म्हणतात, कारण ती आपली नेहमीची जागा सोडून खोडावर अथवा फांदीवर येतात. हे नांव अशा मुळास यथार्थ आहे. तंतूमय मुळेसुद्धा ह्याच सदराखाली येतात. गव्हाचा रोपा एका बीजापासून उत्पन्न होतो, पण त्यास पुष्कळ फांद्या येतात, व प्रत्येक फांदीचे बुडी तंतुमय मुळे आढळतात. ही सर्व तंतुमय मुळे मिळून एक पुंजका बनतो. फांदीपासून मुळे येतात, म्हणून ती अस्थानाद्भूत आहेत, उसाच्या कांड्यापासून आगंतुक तंतुमय मुळे निघालेली नेहमी पाहण्यांत येतात. 'मांसल मुळेः-पावटा, तूर, मोहरी, बाभूळ, सिसव, इत्यादि वनस्पतीमध्ये एक मुख्य मूळ असून त्यापासून दुसरी पोटमुळे फुटतात. मुख्य मूळ हे आदिमूळ ( Radicle ) वाढूनच तयार होते. वरील उदाहरणांत मुळे टणक असतात, पण गाजर, चुकंदर, सलजम, मुळा, वगैरे वनस्पतीत मुळे टणक नसून लबलबीत अगर मांसल असतात. मांसल मुळ्यांचे आकार वेगवेगळे असतात. गाजर बुडाशी वाटोळे असून अग्राकडे निमुळते होत जाते. मुळे अगर चुकंदर बुडाशी किंचित् वाटोळे असून खाली मोठे होतात व पुनः अग्राकडे गांजराप्रमाणे अणकुचीदार होतात. सलजमाचे वूड रुंद व वाटोळे असून ते एकदम शेंड्याकडे निमुळते होते. आर्किंडमध्ये मुळ्या गांठीदार वाटोळ्या व लांबट असतात. कधी कधी ती मुळे हस्तसदृश असून हातांस असणारी बोटें, अगर त्यांसारखे भाग ही त्यांमध्ये आढळतात. राताळी मोठी असून दोन्ही टोकांस किंचित् निमुळती असतात. वरील उदाहरणापैकी राताळी मात्र मागंतुक मुळ्या आहेत. राताळ्यांचे वेल जमिनीवर पसरून जागजागी कांड्यापासून ही मुळे फुटतात, व ती वाढत मोठी होतात. मुळा, गाजर, सलजम वगैरे मात्र आदिमूळापासून वाढल्या कारणाने ती आगंतुक नाहीत, ती केवळ मांसल वर्गापैकी आहेत. __सर्व मांसल मुळांमध्ये वनस्पति कांही विशिष्ट प्रकारचे अन्न सांठवितात. ह्या साठविलेल्या अन्नाचा उपयोग वनस्पतीस जरूरीच्या प्रसंगी होत असतो. कित्येकांत सत्त्व Starch, कित्येकांत साखर Sugar, कित्येकांत नायट्रोजन युक्त द्रव्ये आढळतात. वनस्पतिवर्ग मेहनत करून काटकसरीने पुढील तरतुदीकरितां ह्या अन्नाचा सांठा करितात, प्राणिवर्ग हरप्रयत्न करून त्या संचित