पान:वनस्पतीविचार.djvu/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कल्पना. ११ शवाल तंतुः-(Spirogyra) वाहत्या अगर सांठलेल्या पाण्यांत शैवालतंतू (Spirogyra ) आढळतात. त्यांचा एक तंतु घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शक यंत्राने अवलोकन केले असतां, तो तंतू सारख्या पेशी एकास एक लागून बनला आहे असे आढळेल. प्रत्येक पेशीत जीवनकण असून पेशीचें केंद्र जीवनकणांमध्ये असते. पेशींत फिरकीच्या मळसूत्राप्रमाणे हिरवे पट्टे असतात. व मधून मधून त्या पट्टयांत रत्नाप्रमाणे चकाकणारे पुंजके आढळतात, पुंजक्याभोवती सत्त्वाचे बारीक कण जमलेले असतात. ह्या पुंजक्यास 'पिरनॉइदबॉडीज् । (Pyrenoid bodies.) म्हणतात. शैवालतंतूंची वाढ पेशी विभागाने होते, म्हणजे पेशीचे भाग पडून नवीन पेशी तयार होतात, व त्यामुळे तंतु वाढत वाढत जातो. तंतूंची प्रत्येक पेशी स्वतंत्रपणे आपले जीवन चालवू शकते, पण जोपर्यंत त्या पेशी परस्पर चिकटलेल्या असतात, तोपर्यंत त्या सर्वांचा हितसंबंध एकच असतो. शैवालतंतु वनस्पतीच्या क्षुद्रवर्गापैकी आहेत. भूछत्रांमध्ये नसणारा हिरवा रंग ह्यांत चांगला स्पष्ट असतो, त्यामुळे आपलें अन्न स्वतंत्रपणे हवेतून त्यास मिळविता येते. किण्व. (yeast:)-उसाचा रस अथवा ताडी उघड्या हवेत राहू दिली असतां आपोआप त्यास कुजट घाण येऊ लागते. ही कुजट घाण आंबटावर असते. ह्या आंबट घाणीचे कारण हवेतून किण्व ( yeast) नांवाची एक. पेशामय वनस्पति त्या रसांत पडते.किण्वाबरोबर इतर सूक्ष्म जंतु (Bacteria) ही निर्माण होतात. तूर्त आपण किण्वा ( yeast ) कडेच लक्ष्य देऊ. ही वनस्पति सूक्ष्म असल्यामुळे नुसत्या डोळ्यास दिसण्याजोगी नसते. ती पहावयाप्त सूक्ष्मदर्शक यंत्राचे सहाय घेतले पाहिजे. किण्व वनस्पति त्यारसामध्ये पडल्यावर रसांतील पौष्टिकद्रव्ये शोषून आतली वाढ करूं लागते. वाढ झपा. ट्याने झाल्यामुळे रसांतील पौष्टिकद्रव्ये लवकरच संपतात व त्यांत उलटपक्षी घाणजनक आम्ले तयार होतात. ह्या आम्लांची आंबट घाण पुढे येऊ लागते. म्हणूनच असले पदार्थ कधीही उघडे ठेवू नये. रसांत गोडी आणणारी जी साखर, तींतील आक्सिजन ह्या वनस्पति खाऊन टाकून पाणी व इतर आम्ले बनू देतात. सूक्ष्मदर्शकयंत्रांतून ताडीचा एक थेंब पाहिला असतां पुष्कळ वाटोळ्या पेशी दृष्टीस पडतात. प्रत्येक वाटोळी पेशी ही एक किण्व (yeast) वनस्पति होय.