पान:वनस्पतीविचार.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सजीव व निर्जीव वस्तूंची मिमांसा. naanaamanawrraamana-road कनिष्ट प्राणिवीमध्ये तसेंच कनिष्ट वनस्पतिवर्गात बाह्यदृष्ट्या कोणताही फरक नाही. त्या दोहोंत चलनवलनशक्ति थोडी अधिक असते. डायटम् ( Diatom ), डेस्मिड ( Desmid ) वगैरे एक-पेशीमय वनस्पति पाण्यांत इकडे तिकडे धांवत असतात. अॅमिबा नांवाचे शुद्ध एकपेशीमय प्राण्यास वरील प्रकारची गति असते. जनन, बाल्यदशा, तारुण्य, जन्म व मरण ही दोहोंस साधारण आहेत. दोहोंचें शरीर पेशीमय असते. कदाचित् तें एकपेशीमय अथवा बहुपेशीमय असू शकेल. जसजसे त्यांच्या उच्चवर्गाकडे लक्ष्य द्यावे, तसतसे त्यामध्ये अधिकाधिक फरक दिसू लागतात. उच्च वनस्पतिवर्गास चलनशक्ति नसून त्यास एका जागेपासून दुसरे जागी जाणे शक्य नसते. पण उच्च प्राणिवर्गात ती चलनशाक्त पूर्णावस्थेस पोहोचली असते. अन्नग्रहण करण्याची रीत दोहोंची वेगवेगळी असते.. वनस्पतींस अन्नद्रव्ये कधीही घनस्थितीत शोषतां येत नाहीत. जमिनीतील क्षार पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतरच त्यांस शोधितां येतात; पण उच्च प्राणि बहुतेक अन्न घनस्थितीतच खातात. जमिनीतून क्षार व पाणी तसेंच हवेतून वायु, वनस्पति मूळान्वयें व पर्णद्वारे शोषून घेतात, पण त्यांचे वास्तविक हे खरें अन्न नसून ती केवळ अन्नद्रव्ये होत. त्यांपासून शरिरात निराळे सात्विक अन्न तयार करावे लागते. पण प्राणी जें म्हणून सालो ते त्याचे भक्ष्यच असते, त्यास निराळे स्या अन्नापासून सात्विक अन्न शरीरात तयार करावयाचे नसते. प्राणिकोटी अधिक संकीर्ण रचनेची असल्यामुळे त्यांत फुफ्फुसे, रुधिराभिसरण व्यवस्था, काळीज, अन्नरसनळी वगैरे पूर्ण सोय असते. अशी व्यवस्था वनस्पतिवर्गात नसते. मग ती वनस्पति उच्च वर्गीय किंवा शुदवर्गीय असो. ज्ञानतंतुरचना उच्च प्राणिवर्गात पूर्णत्वास गेल्यामुळे, त्यांस कोणत्याही प्रकारचे ज्ञान चटकन होतें. मनुष्यप्राण्यास में श्रेष्ठत्व आहे ते त्याच्या श्रेष्ठ ज्ञानतंतुरचनेमुळेच होय. श्रेष्ठ पदवी केवळ आकार, वजन अथवा विस्तार ह्यांवर नसून अंतरसंकीर्ण ज्ञानतंतूवर आहे. आतां उच्च वनस्पतिवर्गातसुद्धां ही ज्ञानतंतूरचना फार सूक्ष्म प्रमाणांत असावी, असे वाटते. ह्या बाबतीत वनस्पतिवर्ग प्राणिवर्गापेक्षा फारच मागे आहे, असें म्हटले पाहिजे. आतां कोणत्याही विषयासंबंधी भरपूर सुसंबद्ध माहिती म्हणजे त्या विषयाचें शास्त्र झाले असे समजण्यास हरकत नाही. शास्त्रांत सर्व बाजूंनी व सर्व दृष्टींनी