Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चित्रे ( वुडकट किंवा केवळ नांवें, एवढीच येऊ शकतात. या पुस्तकांत ग्रंथकर्त्याने बऱ्याच झाडांची इंग्रजी नांवें दिली आहेत, ही वांचतांना कांही वाचक थोडेबहुत विचकतील हे खरे; परंतु त्यास उपाय नाही. बोलून चालून विशेषनामें ती, त्यांना मराठीत काय म्हणतात म्हणून विचारल्यास काय सांगावयाचें । काही मराठीत नांवाला इंग्रजीनांवें बनविली आहेत हे खरे; तशीच मराठीत बनवितां येतील व बनलेलीही असतील. परंतु त्यांचा अर्थ करण्यांत बिलकूल अर्थ नाही. पिंपळ, (पिप्पल) कदंब, जांभळ (जॅबोलन ) रोहितक चंपक इत्यादि नांवें तशीच्या तशी इंग्रजीत घेतली आहेत. उलटपक्षी थॉर्नअपल एलफंट अपल, लव्ह अॅपल, अशी नावें बनविली आहेत. कोबी (Cabbage) नवल कोल ( Knol kohl) फूलकोबी (Cauliflower ) हापूस (Alphonso) पायरी ( Pareira) फर्नदीन ( Fenandes ) इष्टापुरी ( Strawberry ) लखोटा ( Loquat ) अशी थोडीशी अपभ्रंश पावलेली नावे मराठीत शिरली आहेत. मिस्तर 'यंग हजचंड ' म्हणजे राजश्री * तरणा नवरा ' नव्हे तसेंच ‘बुलक्सहार्ट ' ( रामफळ ) म्हणजे 'बैलाचें काळीज । नव्हे, याप्रमाणेच कॉसमॉस, गायलरडिया, अॅटिगोनम पेट्रिया, व्हायओलेट, व्हरबीना मसली नावें तशीच्या तशी घेण्यास काय हरकत आहे? येथे उत्पन्न न होणा-या झाडांस साहजिकपणेच नांव नसणार. त्यांचे चित्र दाखवून जेथे ते उगवतें तेथील लोक त्याला अमक नांवाने ओळखतात असें सांगितल्यास ते नांव ग्राह्य कां होऊं नये याचे कारण देता येत नाही. एकंदर अस्तित्वात असलेली गांवठी नांवें तरी पूर्ण परिचयाची असती, तर ह्या बिचक ण्याचे थोडे तरी मंडन करता आले असते परंतु वस्तुस्थिति तशी नाही. बांदररोटी, उंदीरकानी, दिपमाळ, कपाळफोडी, प्रशीपत्री, अशी किती तरी नांवें आहेत की जी साधारणपणे परिचयाची नाहीत. केवळ परिचयाच्या पांचपन्नास झाडांच्या जोरावर वनस्पतिशास्त्राचें अध्ययन तरी कसे व्हावें ! रुसो जपानी ग्रुद्धाचे मर्म समजून घेण्यास ओकू, नोझडू, नागी, टांगो, अशी चमत्कारिक वाटणारी नांवें अडथळा करूं शकत नाहीत. 'टंगची व्हंगटी' ला फूचंग, अशा नांवाने मनुष्य भेदरत नाही आणि चीनच्या इतिहासाचे वाचन टाकीत नाही तसेच ' सत्कुर्मस्त्वामिह स्यांढर्ट नृपवरा ' यातील अपरिचित महाप्राणा