पान:वनस्पतीविचार.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ आमची एकंदर इंद्रियेच अशी दुबळी आहेत की खात्रीपूर्वक घडून आलेल्या परिणामांच्या पूर्वपीठिकेची मीमांसा त्यांस होत नाही, मग भविष्यत्काली होऊ घातलेल्या कार्याचे कारण जाणणे बाजूलाच राहिले. रसायनशास्त्रवेत्ते पाणी, लोह, चुना, फास्फरस इत्यादि अनेक पदार्थ मनुष्य शरीराचे घटक म्हणून दाखवितात आणि जीवनशास्त्रविशारद कमी अधिक प्रमाणाने रूपांतर पावलेल्या पेशी, अस्थि, स्नायु, रुधिर, त्वचा वगैरे शरीराच्या भागांतून काढून दाखवितात; परंतु हे घटक भाग एकत्र करून हा शरीर रूपी गाडा कोणी कसा चालू केला हे त्यांच्याने सांगवत नाही आणि पेशींच्या एकीकरणाने बनलेल्या शरीराचें सौंदर्य अगर कुरूपता याचा मागमूस सांगता येत नाही. आनुवंशिक संस्कार घडलेले दिसतात व त्यांची दृश्यफलें अनुभवण्यास मिळतात. परंतु सूक्ष्मपेशीवरील संस्कारदर्शक सूक्ष्मतर लिपी वाचता येत नाही. सारांश अशा प्रसंगी कारणाचा उमज पडला नाही म्हणून कार्याच्या खरेपणाबद्दल मन साशंक राहूं शकत नाही, याकरितां 'सब झूट । पंथ पत्करण्यापेक्षां श्रद्धालुपणा पत्करणे विशेष सयुक्तिक अगर सुसंगत होईलसें वाटते, कारण पहिल्यामध्ये वाजवीहून फाजील घमेंड येते आणि दुसऱ्यामध्ये खराखुरा विनय येतो. ग्रंथकाराने हा ग्रंथ अशाच भावनेने लिहिला आहे व वाचकांनीही पण त्याच भावनेने वाचला पाहिजे. या विषयाचा इंग्रजीतून परिचय करून घेतले. ल्यांना हा ग्रंथ कांहीसा भाषांतररूप वाटेल; त्यास उपाय नाही. निव्वळ देशी उदाहरणे देणे, क्लिष्ट आणि पारिभाषिक शब्द होतां होईतों न वापरणे इत्यादि उपायांनी ग्रंथाचा रुक्षपणा कमी करून त्याला आधिक मनोहर करतां येते; परंतु सबंध विषय हाती घेतल्यानंतर वरील पद्धतीने सांगोपांग विवेचन होण्यास अडचण येते. अशा कामी चित्रांची योजना अत्यंत आवश्यक व उपयुक्त असते, परंतु हुबेहुब चित्रे आजतारखेस येथे क्वचितच तयार होतात आणि जी होतात ती मिळविणे हे अनेक तन्हेनें ग्रंथकर्त्यांच्या शक्तीबाहेरचे आहे. झाडाचे हुबेहुब चित्रच दाखविलें म्हणजे नांवाचे फारसे महत्त्व उरत नाही. वनस्पति-बाग तयार करून त्यांत साक्षात् जिवंत झाडे दाखविणे किंवा झाडाचे भाग वाळवून जपून ठेवणे आणि त्यांचा उपयोग करणे, हे विषय अगदी अलग आहेत. ग्रंथलेखनाशी त्यांचा काही संबंध नाही. ग्रंथामध्ये