पान:वनस्पतीविचार.djvu/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१वें]. उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence) १८३ साधारण एक पूर्ण दांडी बनते. विशेषेकरून उपपुष्पपत्रं ( bracts ) लवकर गळून गेल्यामुळे पुढे हा नियमित प्रकारच आहे किंवा नाही, याची शंका चाटू लागते. पण जेव्हां कोवळेपणी उपपुष्पपत्रे गळून जात नाहीत, त्यावेळेस उपपुष्पपत्र फुलाचे समोर एक एक असते, म्हणूनच ते फूल अग्राकडे आहे अशी खात्री पटते. जर उपपुष्पपत्राचे पोटी फूल येते, तर मात्र ते अग्रावर आहे असें वाटणार नाही. शिवाय त्यासमोर येणाऱ्या उपपुष्प पत्राच्या पोटी दुसरी कळी वगैरे नसते. जी दांडी वाढत पुढे गेली असते, तीच त्या उपपुष्पपत्रांतून उगम पावते असे समजावे. नाही तर हा प्रकार साध्या मंजिरीसारखा (Raceme ) समजला जाईल. भोंकर व जवस वर्गात वरील प्रकारचे मोहोर पुष्कळ ठिकाणी आढळतात. मिश्रित मोहोर पुष्कळ वेळां पाहण्यांत येतात. झाडांवर शेकडो फुलें निरनिराळ्या फांद्यावर असल्यामुळे सर्वसाधारण मोहोर एक प्रकारचा व व्यक्तिमात्र फांदीवर दुसऱ्या प्रकारचा. असे मिश्र प्रकार पुष्कळ वेळां दृष्टीस पडतात. जसेसूर्यकमळ, झेंडू, वगैरे. सूर्यकमळाचें पसरट व रुंद फूल झुपकेदार असून त्यांत व्यक्तिमात्र लहान फुलें परिधाकडून मध्यभागांकडे उमलत असतात, त्यामुळे तो अनियमित प्रकार होतो. पण येथे विशेष लक्ष्यात ठेविण्यासारखी गोष्ट ही की, प्रथम फूल अंगर गुच्छ अग्रांवर येऊन नंतर खालील फांद्यावर दुसरी फुले येत जातात. तसेंच अयाकडील गुच्छ तयार होऊन प्रथम त्यांत बीजें तयार होतात. मागाहून खालील गुच्छांत ती उत्पन्न होतात; म्हणजे व्यक्तिमात्र प्रकार अनियमित असून साधारण प्रकार नियमित असतो. म्हणूनच येथे दोन्ही प्रकारांचे मिश्रण होते. अशा प्रकारांचे मिश्रण असल्या गुच्छवर्गात नेहमी असते. तुळसी वर्गातही असले मिश्रण आढळते. तुळसीमध्ये मुख्य मंजिरी अनियमित असून व्यक्तिमात्र गुच्छांत त्यांची मांडणी नियमित असते. म्हणजे जी स्थिति सूर्यकमळांत, त्याचे उलट येथे असते. केशवर्गात ( Scrophularacete ) अशाच प्रकारची मिश्रित मांडणी असते. येथे फुलें सर्व साधारणपणे अनियमित असून पोटमोहोर नियमित असतात. उपदांडीच्या अग्राजवळ, तसेंच बुडाकडे फुलांचे घोस चिंचोळे असून मध्यभागी फुलें अधिक खेचिल्यामुळे तो भाग रुंद व मोठा होतो. द्राक्षामध्ये