पान:वनस्पतीविचार.djvu/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२- वनस्पतिविचार, [प्रकरण अनियमित प्रकारांत झाडाच्या कमी अधिक वाढीप्रमाणे तसेंच कांहीं आगंतुक कारणांनी फरक होऊन मोहोर चमत्कारिक दिसतात; पण ते नेहमीचे नसून विशिष्ट कारणांनी उत्पन्न झाले आहेत हे लक्ष्यात ठेवावें. : नियमित मोहोराचे प्रकारांत फुलांची वाढ नियमित असते, हे वर सांगितलेंच आहे. काही वेळां अग्राकडे एक फूल येऊन नंतर खाली दुसरी फुलें येतात. अथवा नुसते एकच फूल अग्रांवर येऊन वनस्पतीची वाढ खुंटते. अथवा उपपुष्पपत्राचे पोटी एक एक फूल येत जाते. त्यामुळे तेथून वाढणाऱ्या मोहराची वाढ खुंटते. गुलाब, लिंबू, चकोत्रा, वगैरेमध्ये फुलें नियमित असतात. दांडीवर पहिलें फूल प्रथम उमलून त्याचेंच प्रथम फळ होतें. आयक्झोरा, कॉपी, मंजिष्ठ, वगैरेमध्ये फुलांची मांडणी नियमित असते. आयक्झोरामध्ये फुलांचा आकार झुपकेदार असून प्रत्येक झुबक्यांत तीन फुले असतात. पैकी मधलें फूल प्रथम फुलून त्यांचे बी तयार होते. मुख्य दांडीवर शाखा, पोटशाखा येऊन एकंदर आकार नियमित झुपकेदार असतो. फांद्याचे नियमित द्विपाद अगर बहुपाद वगैरे प्रकार पूर्वी सांगितले आहेत. तसेच प्रकार येथे मोहोरांत आढळतात. जवसामध्ये मुख्य दांडीच्या अग्रावर एक फूल आल्यावर खाली दोन उपदांड्या वाढून प्रत्येकी तसेंच अग्रावर फुले येतात. नंतर पुनः पूर्वी प्रमाणे त्या प्रत्येक फुलांचे खाली दोन लहान उपदांड्या निघून प्रत्येकांवर टोकास पूर्वीसारखें फूल असते. अशा प्रकारास * नियमित दिपाद ' (Cymose dichassium) म्हणून समजतात.आरेनेंरिया Arenaria नांवाचे वनस्पतींत वरीलप्रमाणेच नियमित द्विपाद आढळतो. मोतियानांवाचा बागेत एक रोपा आढळतो. त्याची फुले मोत्यासारखी पांढरी वाटोळी व लहान असतात. येथे मोहोर नियमित द्विपाद असतो. 'पानशेटिया नांवाचे वनस्पतींत दोन्हीपेक्षा अधिक उपदांड्या एका जागेपासून निघून फुलांची साधारण रचना नियमित असते. अशा ठिकाणी नियमित बहुपाद (Cymose Poly chassium ) म्हणतात. हमलिया नांवाचे झाडांत मोहोर 'एकमार्गी नियमित,' (Sympodium) असतो. म्हणजे एकाच बाजूकडे फुले येत जाऊन प्रत्येक फुलाचें स्थान हा उपदोडाच अनावर असते. ह्या ठिकाणी लहान उपदांड्या मिळून सर्व