पान:वनस्पतीविचार.djvu/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० वनस्पतिविचार. [प्रकरण M प्ररकण १९ वें. . पुंकोश व स्त्रीकोश. पुंकोश Androecium:-हें वर्तुळ पूर्ण फुलांत पांकळ्यानंतर स्त्रीकोशापूर्वी येते. केवळ स्त्रीकेसर फुलांत ह्या वर्तुळाचा अभाव असतो. पुंकेसर फुलांत तीन भाग विशिष्ट प्रकारचे असतात. पहिला भाग केसर ( Filament ) दुसरा भाग, पराग पिटिका (Anther) व तिसरा पिटिकेंतील परागकण. हे तिन्ही मिळून एक पंकेसर बनतो. कधी कधी केसर असत नाही. जसें वांगे, बटाटे वगैरे. जसें पानास पत्र असते तसे पुंकेसरदलास पराग पिटिका असते. पराग पिटिकेचे रंगही पुष्कळ प्रकारचे आडळतात. विशेषेकरून पांढरा रंग पुष्कळ फुलांत असतो. जसें कण्हेर, जाई, धोत्रा, वगैरे. केसर filament हा निरनिराळ्या आकाराचा असतो. गहूं, बाजरी, जव वगैरेच्या फलांमध्ये तो नाजूक व अगदी तंतुसारखा असतो. कर्दळ, लिली, घायपत, वगैरे फुलांत तो जाड असतो. कधी कधी त्यांवर उपांगें असतात. जसे भोंकर. कांद्याच्या फुलांत त्याच्या उपांगास दातासारखा आकार येतो. रुई, मांदार, हरिणखुरी वगैरेच्या फुलांमध्ये उपांगें शृंगासारखी असतात. काही ठिकाणी परागपिटिका मुळीच नसून केसर जाड होतात. अशावेळी त्यास लहान पाकळ्या सारखा आकार येतो. गुलाब, कर्दळ वगैरेच्या फुलांत अशा प्रकारची स्थिति आढळते. त्यांची लांबी, जाडी, रुंदी, तसेंच वेगवेगळे रंग, वाढण्याची दिशा, ही निरनिराळ्या फुलांत वेगवेगळ्या त-हेची असतात. गुलछबु, धोत्रा, वगैरे फुलांत तो लांब असतो. तसेंच तृण जातीत फुलांच्या आकारमानाने ते लांब असतात. वांगी, बटाटे, भोंकर, वगैरेमध्ये ते अगदी लहान असतात, अथवा मुळीच नसतात, असे म्हटले असतां चालेल. बहुतेक त्याची दिशा सरळ, आत वळलेली अथवा लोंबती असते. ह्यासही अपवाद पुष्कळ असतात. पानशेटिया फुलांत केसरास एक जोड असून त्यावर परागपिटिका असते. खरोखर तो व त्यावरील पिटिका. मिळून एक अपूर्ण स्वतंत्र केवल