पान:वनस्पतीविचार.djvu/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ वें]. पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश Calyx पुष्पमुगुट Corolla). १५९ कमी अधिक पांकळ्यांच्या वाढीप्रमाणे पांकळ्यांसही कधी कधी उपपाकळ्या येतात. कृष्णकमल फुलांत पांकळया झाल्यावर आतील बाजूस पांकब्यांसारखी उपांगें येतात. त्यामुळे फुलांस विशेष शोभा येते. काही फुलांत एक पांकळी जास्त वाढून नागाच्या फणाप्रमाणे दिसते. खालील बाजूस इतर पांकळ्या एकमेकांस चिकटलेल्या असतात. काही फुलांत देंठ व पांकळीचा रुंद भाग जेथें चिकटला असतो, तेथें केंसासारखे भाग येतात. जस कण्हेर वगैरे. - सांकळ्याप्रमाणे पांकळ्यासुद्धां गर्भधारणक्रिया घडल्यावर सुकून गळू लागतात. द्राक्षामध्ये फूल उमलले असतां लागलीच पांकळ्या गळून जातात. कायम टिकणा-या पाकळ्या फार कचित् आढळतात. असो; याप्रकारचे फुलांतील बाह्यसंरक्षक वर्तुळांचे वर्णन संपले. यापुढे पुंकेसर व स्त्रीकेसरभागाचा विचार व्हावयाचा आहे. पुंकेसर दलांत पुरुषतत्त्व असून ते स्त्रीकेसरतत्वाशीं मिलाफ पावलें असतां, त्यापासून बीज अगर मुग्ध दर्शत असणारा रोपा तयार होतो. बीज तयार करणे हे फुलांचे मुख्य कर्तव्य असून ते साधण्याकरितां त्यास योग्य ते आकार येतात. बीजापासून वनस्पतींची परंपरः कायम राहते. केवलपुंकेसर फुलांपासून बीज तयार होत नाही. बीज उत्पन्न होण्यास अवश्य स्त्रीकेसर फूल पाहिजे. केवल-पुंकेसर फुलांतील परागकण केवल स्त्रीकेसर फुलांस उपयोगी पडतात. ते परागकण किड्याच्या साहाय्याने अथवा फुल-पांखराचे पंखास चिकटल्यामुळे स्त्रीकेसर फुलांस पोहोंचविले जातात. तसेंच वारा वाहूं लागला असतां परागकण उडून जेथें जरूर असेल तेथे आपोआप उपयोगी पडतात. पाण्यांचे कांठी उगवलेल्या वनस्पतीमध्ये सुद्धां परागकण पाण्यांत पडून प्रवाहाबरोबर वाहून केवल-स्त्रीकेसर फुलांस मिळतात. केवलस्त्रीकेसर फुलें ऋतुकाली पुरुष तत्त्वाची वाट पाहत असतात. योग्य संधी आली की, गर्भधारणा पूर्ण होते. पांकळ्यांचे सुंदर रंग, अगंतील मधोत्पादक पिंड, तसेंच त्यांचा सुवास, वगैरे गोष्टीही अप्रत्यक्ष मदत गर्भधारणा घडवून आणण्यास आपआपल्यापरी देत असतात. खरोखर ह्या सर्व गोष्टींचे बारीक निरक्षिण केलें म्हणजे प्रत्येक जीवनमात्रासंबंधी त्यास अवश्य लागणा-या वस्तूंची तजवीज व त्यांत दाखविलेले अगाध चातुर्य, ह्यांचे कौतुक करावे तितकें थोडेच आहे.