Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अगर वॉटरमन ( पाणीवाला ) यांच्या हातून होत नाही. तद्वत्च प्राण्याच्या शरीराच्या एंजिनांतील आम्ही (वैद्य, डाक्टर, हकीम वगैरेसुद्धां ) केवळ फायरमेन अगर वाटरमेन आहों, तहान लागली म्हणजे आम्ही या एंजिनांत ( शरीरांत ) पाणी भरतों आणि भक लागली म्हणजे अन्नरूप कोळसा अगर सरपण भरतों; इतकेच काय ते. याच्या पुढची अक्कल आमच्या ड्रायव्हरनें आम्हांस शिकविलीच नाही. हा ड्रायव्हर म्हणजे प्राण होय, व त्याची कामें तोच करूं जाणे. आता इतकें खरें की, रसायनशास्त्ररीत्या पदार्थाचे पृथक्करण करून, वरील प्रकारची अक्कल पैदा करण्याचा आटोकाट प्रयत्न मनुष्याने केलेला आहे; परंतु तो प्रयत्न कितपत फलद्रूप झाला आहे, हे आजमितीस सर्वत्र चांगलेच कळून चुकले आहे. रसायनशास्त्रवेत्ते सांगतात की, हिरा म्हणजे केवळ निर्भेळ स्वच्छ कार्बन म्हणजे जवळ जवळ कोळशासारखा. तथापि कोळशाचा मुबलक पुरवठा असून आणि हवा तितका कार्बन मिळण्यासारखा असून अद्यापि त्यांनी एकहि 'कोहिनूर' तयार केला नाही, आणि किमयागारांनी सोनेही अद्यापि स्वस्त केले नाही. पाण्याचे पृथक्करण करून ऑक्सिजन (प्राणवायु) व हायद्रोजन काढून दाखवितात, आणि ती दोन्हीं मूलतत्त्वे एकत्र करून पाणी बनवितात; परंतु अवर्षण पडल्यास हा रासायनिक प्रयोग कितपत उपयोगी पडेल, याची जबरदस्त शंकाच आहे. अंडी, मांस, गहू, तांदूळ, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची पृथक्करणे झालेली आहेत; परंतु अद्यापि कोणत्याही रसायनशाळेतून खाद्य, पेय, लेह्यादिकांचा पुरवठा करण्यात येत नाही. सारांश प्राणाचें खरे स्वरूप चांगले कळलेले नाही. हे कळलेले नसल्यामुळे म्हणा, अगर वस्तुस्थितीच तशी असल्यामुळे म्हणा, चोहीकडे प्राण भरून राहिला असल्यासारखा भास होतो आणि मरण म्हणजे काय, याचा चांगला उलगडा पडत नाही. अखिल वस्तुसमुदायास लागू करण्यासारखे म्हणून उत्पत्ति-स्थिति-लय हे शब्द योजितात आणि त्यांपैकी सचेतन अगर सजीव समजल्या जाणान्यांसंबंधाने जनन, जीवन आणि मरण हे शब्द वापरतात. उत्पत्तीची मीमांसा करूं लागलं म्हणजे अखेर तळाशी हाताला कांहींच लागत नाही, आणि अज्ञान कबूल करण्याच्या ऐवजी आपण 'अनादि' शब्दाचा उपयोग करून ज्ञानाचा आविर्भाव आणतो. लयाची मीमांसादेखील अशीच मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबते आणि