पान:वनस्पतीविचार.djvu/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ वनस्पतिविचार. [प्रकरण खर वाढ झाली असे म्हणता येईल. नुसता मोठा आकार होणे म्हणजे वाढ नव्हे; तसेच पाण्याने चोहोबाजूने तणाणणे म्हणजे वाढ नव्हे. तर त्यांत नवीन सजीव ‘पदार्थ तयार होऊन कायमचा मोठा आकार होणे हे खऱ्या वाढीचे लक्षण आहे. - वाढ म्हणजे नव्या जीवन कणाची उत्पत्ति होऊन त्यापासून वनस्पतिघटनात्मक कार्य बनत असते. त्याचा परिणाम शरीराचा आकार वाढून त्याचे वजनही अधिक होते. वाढीस चार पांच गोष्टींची अवश्य जरूरी असते. ह्या गोष्टी योग्य प्रमाणांत मिळत गेल्या म्हणजे वाढीचे काम सुरळीतपणे चालते. जेथे वाढ होण्याची असते त्याठिकाणी पोषक द्रव्याचा भरपूर सांठा पाहिजे. ह्या सांठ्यापासून पेशी-घटक-द्रव्ये तसेंच जीवनकण घटकावयव उत्पन्न होतात. नेहमी वाढत्या कोंबांत पुष्कळ पोषक द्रव्ये खर्च होतात. ह्याचे कारण असे आहे की, तेथे नवीन पेशी उत्पन्न होऊन पूर्वीच्या पेशीस कायमस्वरूप प्राप्त होते. - पोषक अन्नाप्रमाणे पाण्याची ही जरूरी असते. पोषक अन्न द्रवस्थितीत जात असते. याकरितां पाणी अवश्य पाहिजे. तसेंच पेशी तणाणण्यास पाण्याची जरूरी असते. अधिक पाणी पेशति न शिरेल तर पेशी तणाणणे बंद होईल. तणाणण्याची कायम स्थिति राखण्यास पाण्याचा भरपूर पुरवठा पाहिजे. म्हणून जितकें पोषक अन्न महत्त्वाचे असते, तितकेंच पाणी महत्त्वाचे आहे, ह्यांत संशय नाही. तिसरी अवश्य स्थिती म्हणजे एक प्रकारची विशिष्ट उष्णता होय, उष्णतेशिवाय वाढ होणार नाही. ऑसमॉसिस् क्रिया किंवा बाष्पीभवन ह्यास उष्णतेची जरूरी असून ह्या क्रियेशिवाय निरींद्रिय द्रव्ये व पाणी वर चढणार नाहीत. तेव्हां पाणी व सेंद्रिय अन्न वगैरे जी वाढीची साधनें ती तयार होण्यास उष्णतेची जरूरी असते. ह्या साधनांशिवाय वाढ होणार नाही. तसेच उष्णते. मुळेच द्रवात्मक सेंद्रिय पदार्थावर काही विशिष्ट कार्य घडून जीवनकणाची घटना होते. जीवन-पदार्थ-घटना म्हणजे खुल्या उष्णतेची मोट एकेजागी बांधून गुप्त स्वरूपांत ठेवणे होय. ह्या दृष्टीने वाढ म्हणजे खली उष्णता नाहीशी करून एकत्र व्यवस्थित स्वरूपांत ठेवणे असे होते. जीवनकण-घट ना झाल्यावर