पान:वनस्पतीविचार.djvu/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें]. पचन, वाढ व परिस्थिति. १३१ mmmmmwwwimmmmmmwwwanm~ - असो; सेंद्रिय द्रव्ये तयार झाली किंवा त्यापासून अल्ब्यूमेन द्रव्ये बनलीं, अथवा हवेत उष्णता किंवा जमिनीत पाणी ही पुष्कळ असली, तथापि त्यांपासून नवीन वाढ होत नसते. त्यावर जीवनकार्य झाले पाहिजे, म्हणजे सजीवतत्वाच्या चैनन्य शक्तीने वाढीस उपयोगी पडणाऱ्या साधनापासून नवीन कण तयार झाल्यावरच खरी वाढ झाली असे म्हणता येईल. केवळ ही सर्व साधनें एकेजागी गोळा केली असतां इच्छित वाढ होत नसते, म्यास सजीव तत्त्वाचे अवश्य साहाय्य पाहिजे, त्याविना काही नाही. वाढः–मुळांच्या किंवा खोडांच्या वाढत्या कोंबाकडे लक्ष्य दिले असतां, असे आढळून येईल की, रोज रोज त्याची थोडी थोडी वाढ होत असते. कोवळ्या पानापासून मोठी पाने तयार होतात. लहान फांदीपासून मोठी फांदी होते. ही वाढ कशी होते व ह्या वाढीस कोण उत्पादक आहे, हे मात्र सहसा कळणार नाही. वाढत्या कोंवांत संवर्धक पदर असून त्यांच्या पेशींत द्विधा होण्याची शक्ति मोठी जबर असते. त्यामुळे नेहमी नवीन पेशी होत जातात. नवीन झालेल्या पेशी पहिल्याप्रमाणे मोठ्या होतात. त्यांत पेशीद्रव्ये, सजीवकण वगैरे जमत जाऊन पुनः त्यापासून नवीन पेशी उत्पन्न होतात. त्या पेशीस पुढे कायमचे स्वरूप प्राप्त होते. कोंबाच्या अग्राजवळच्या पेशी वाटोळ्या असतात. खालील बाजूच्या पेशी लंब व दीर्घ होतात. प्रथम पेशी मध्ये पाणी जमून जेव्हां चोहोबाजूस ती तणाणते, त्यावेळेस पेशीस पूर्वीपेक्षा मोठा आकार येतो. हा अकार कायम टिकणारा नसतो. कारण पेशींतील पाणी दुसरे पेशीत जाऊन ती पूर्ववत् संकुचित होते. तणाणलेल्या स्थितीत जीवनकणभित्तिकेच्या बाजूकढे सारखे असतात. जीवनकणापासून नवीन पदार्थ भित्तिकेवर जमून भित्तिका पूर्वीपेक्षा जाड व मोठी होते. पेशीमध्य. भागांत जडस्थाने ( Vacuoles ) असल्यामुळे नवीन पाणी त्या ठिकाणी जमून पेशी पूर्वीपेक्षा जास्त तणाणते. ह्यावेळेस पूर्वीपेक्षा ती पेशी जास्त व टणक झाल्यामुळे फाटण्याची भीति नसते. ही तणालेली स्थिति बहुतेक कायम राहते. कारण आंत जमलेल्या जीवनकणांपासून पेशीचटकद्रव्ये तयार होऊन ती भित्तिकेवर जमत गेल्यामुळे पेशीची वाढ कायम होते. तसेच नवीन सजीव शरीरे जेव्हां पेशीत उत्पन्न होऊन पेशी मोठी होते त्यावेळेस पेशीची खरो