पान:वनस्पतीविचार.djvu/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ वनस्पतिविचार, [प्रकरण आळंबी पोहोंचविते. एकूण दोन्ही परस्परांस उपयोगी पडून परस्पर जीवनकार्यै साधितात. काही उच्चवर्गीय झाडांच्या मुळ्यांचा व आळंब्याचा अशा प्रकारचा परस्पर फायदेशीर संयोग होतो. ओक जातीच्या कांही झाडांत मुळे जमिनीत घुसल्यावर त्यावर शोषक केस येत नाहीत. पण अशा वेळेस आळंब्याच धाग मुळांवर वादन मुळांची सर्व बाजू व्यापून टाकितात. इतकेच नव्हे तर हे धागे जमिनींत घसन केसाप्रमाणे शोषणक्रियेस उपयोगी पडतात. सरासर मळांवरील शोषक केस न आल्यामळे ही झाडे वाळून गेली पाहिजत; पण होत नाही. कारण केसाचे काम आळंबी धागे करीत असतात, मोबदला त्यास मुळांतून सात्विक सेंद्रिय पदार्थ मिळतात, ह्यामुळे दोघांचे परस्पर काम होते. 'जगांत कांही द्यावे व कांहीं उलट घ्यावे, असा न्याय्य आहे व तदनुसार येथे परस्पर प्रकार घडतो. खरोखर अशा ठिकाणी उच्च वर्गीय वनस्पति शुद्रवर्गीय वनस्पतीवर पुष्कळ अंशी अवलंबून असते. नेहमी क्षुद्र वनस्पति उच्चवनस्पतीवर उपजीविका करते; पण वरील ठिकाणी उलट स्थिति असते. ह्याच प्रकारचा संयोग डाळवर्गातील मुळांचा व सूक्ष्म जंतू (बॅक्टिरिया) चा असतो. बॅक्टिरिया हवेतून नायट्रोजन वायु शोषण करून त्या झाडास पुरवितात व उलट ते त्यांतून सेंद्रिय पदार्थ भक्षण करितात. भुईमूग, वाटाणे, उडीद, मूग वगेरे झाडे मुळासकट उपटून पाहिली असता मुळावर फोडासारख्या वाटोळ्या ग्रंथी आढळतात. ह्या ग्रंथीमध्ये सूक्ष्म बॅक्टिरिया जंतू असतात. मागे सांगितलेल्या वृक्षांदनी वनस्पतींत जरी दोन वनस्पतींचा संबंध येत असतो, तथापि दोन्ही परस्पर साहाय्य न करितां, एक दुसन्यावर आपला योगक्षेम चालवितात. त्यामुळे दुसऱ्यास फायदा न होतां उलट नुकसान होते. दोन्ही परस्पर मदत करती तर दोहोंचे नुकसान न होतां उलट फायदा दोहोंसही झाला असता. सेंद्रिय पदार्थ तयार झाल्यावर ज्या भागास जरूरी असेल त्या भागात त्यांची पाठवणी करणे हे पुढील काम असते. शिवाय पानामध्ये हे पदार्थ पुष्कळ वेळ राहू दिले, तर नवीन सेंद्रिय पदार्थ बनण्यास अडथळा येईल. तयार झाल्याबरोबर ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था झाली पाहिजे.