पान:वनस्पतीविचार.djvu/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वें]. क्षार, कार्यन्वायु व हरित्वर्ण शरीरें. १११ होत नाही खास. गंधक व फॉस्फरस, स्पलपेटस अथवा फॉसपेट्स मधन वनस्पतिशरीरांत येते. विशेषेकरून उच्चवर्गातील वनस्पति-शरीरांत गंधक आढळते. फॉस्फरस हे सजीव केंद्रभागांत असते खरे, पण ह्याचा उपयोग नायट्रोजनयुक्त शरीरे तयार करविण्याकडे होतो. कांहीं बीजांत फास्फरस अधिक असते. जसे, एरंडी, बाझिलनट, वगैरे. सेंद्रियपदार्थ सूर्यप्रकाशांत हरितवर्ण शरीरांकडून बनविले जातात. हरितवर्ण शरीरे जीवनकणाची बनलेली असतात. हा हरितवर्ण पानांपासून . अथवा पानांतील हरितवर्ण शरीरांपासून वेगळा करितां येतो. हिरवें पान आलकोहलमध्ये ठेवून दिले असता, हरित्वर्ण पानापासून वेगळा होऊन अलकोहलचे बुडौं राहतो. जशी हरितवर्ण शरीरें वनस्पतिशरारांत आढळतात, त्याचप्रकारची शुभ्र शरीरेही असतात. शुभ्र शरीरापासून हरित्वर्ण शरीरें अथवा उलट हरितवर्ण शरीरांपासून शुभ्र शरीरें बनतात. हरितवर्ण शरीरें बनण्यास सूर्यप्रकाशाची जरूरी असते, व शुभ्र शरीरें बनण्यास अंधःकार लागतो. पूर्वी असा समज होता की, हरितवर्ण पिवळ्या व अस्मानी रंगाच्या मिश्रणाने तयार होतो; पण अलीकडील प्रयोगांनी हा समज चुकीचा आहे असे सिद्ध झाले आहे. हरितवर्ण शरीरांतील हिरवे कण निरनिराळ्या आकाराचे असतात. तसेंच हिरवळ खोड व पाने ह्यांमधील हरितवर्ण कण निराळे असतात, म्हणजे एकाच वनस्पतीचे सर्व भागांत सारख्या आकाराचे कण असत नाहीत. मळसूत्री, नक्षत्रारुति, अथवा कधी कधी पट्टेदार हिरवे कण आढळतात. त्याचप्रमाणे हरितवर्ण शरीरांत कणांची संख्या एकापासून ते शेंकडों गणती असते. पानाच्या रचनेत वरील बाजूकडे असणा-या लोखंडी गजासारख्या पेशी जालातील हरितवर्ण शरीरांत हे कण खालील स्पंजासारख्या पेशीजालापेक्षां चौपट अथवा सहापट अधिक असतात. असले हरितवर्ण कण जितके अधिक व्यवस्थित रीतीने सूर्यप्रकाशाकडे उघडे राहतील, तितकें सेंद्रिय पदार्थ बनण्याचे अधिक कार्य होत असते. पण जर त्या कणांचा अव्यवस्थित ढीग बनून राहील च चांगल्या रीतीने सूर्यप्रकाश त्यास न मिळेल, तर त्यापासून अधिक कार्य होणार नाही. सूर्यप्रकाशांत हरिजक शरीरांत एकप्रकारची उत्तेजित शक्ति उत्पन्न होऊन तिचे योगाने हवेतून कार्यन्वायु शोषिला जातो. हरित पेशीजालांमध्ये कार्बन आम्लाचे पृथक्करण होतें, व त्यांचा मिलाफ निरिंद्रियद्रव्यांशी योगाने हवेतून का शरीरात एकप्रकारचान अधिक कार