पान:वनस्पतीविचार.djvu/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें]. अंतररचना. wwwmmam wwwwwwwwwwwwwwimmmmmmmmmmmmmmmmmmm भागावर पुष्कळ असतात. वरील पृष्ठभागावर अधःपृष्ठमागाचे मानानें त्वचारं| मुळीच असत नाहीत असे म्हटले असतां चालेल. द्वाररक्षक पेशीमध्ये हरित वर्ण शरीरे असून जवळच्या पेशींत सात्त्विक कण आढळतात. बाह्यत्वचेच्या इतर पेशींमध्ये कधीही सात्त्विककण सांपडत नाहीत. बाह्यत्वचेमध्ये पिंडमय केंस (Glandular hairs ) ही असतात, २. बाह्यत्वचेनंतर वरील पृष्ठभागांत लोखंडी गजासारख्या लांबट पेशींची मालिका ( Palisade parenchyma ) हिरवीगार असते. ह्या मालिकेत पुष्कळ हरितवर्ण शरीरे असल्यामुळे पानांस हिरवागार रंग येतो. कधी कधी एका रांगेवर दुसरी रांग येते. मधून मधून अरुंद पेशीमध्ये पोकळ्या (Inter .cellular spaces ) आढळतात. ३. खालील भागी लोखंडी गजासारख्या लंबपेशी न आढळतां स्पंजाप्रमाणे अव्यवस्थित जाळीदार पेशीमालिका वरील मालिकेशी जुडलेल्या असतात. गजासारख्या लंबपेशीमालिका तसेंच स्पंजासारख्या जाळीदार पेशी मिळून बहुतेक पानांचा मध्यभाग भरलेला असतो. मधून मधून ग्रंथी अथवा ग्रंथीच्या फिरकीदार अथवा वळेदार वाहिन्या दृष्टीस पडतात. पानांच्या शिरा कठीण काष्ठाच्या बनल्या असतात. अव्यवस्थित स्पंजासारख्या पेशीमध्ये पोकळ्या मोठमोठ्या असतात. शिवाय त्वचारधे अधःपृष्ठभागांवर अधिक असल्यामुळे त्यांचा असल्या पोकळ्यांशी विशेष संबंध येतो. कधी कधी निरािंद्रय द्रव्ये निरनिराळ्या स्फटिकमय आरुतीत रचलेली पानांमध्ये आढळतात. ह्या पानांत विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही बाजू निरनिराळ्या अंतररचनेच्या असतात. वरील पृष्ठभाग व अंधःपृष्ठभाग ह्यांत रचनेसंबंधी नेहमी फरक असतो. वरील पृष्ठभाग अधिक हिरवा असून अधिक सफाईदार असतो, पण अधोभाग शिरांमुळे जास्त गडबडीत झाला असून त्यांत वरीलप्रमाणे हिरवा रंग नसतो. उन्हामध्ये असले पान समोर धरिले असतां अधोभागांत फिक्का रंग असतो, ह्याची साक्ष सहज पटेल. खोड किंवा मुळे ह्यांमध्ये दोन्ही बाजू सारख्या रचनेच्या असून मुख्य तत्त्वांत फरक नसतो. पानांची रचना वरील दोन्हींपेक्षा वेगळी असून, पाठ व पोट परस्पर भिन्न असतात. पानांस ज्या प्रकारचे काम करावे लागते, त्यास योग्य असाच आकार येतो. तसेंच पाट व पोट भिन्न असल्यामुळे पानांस आपले काम फार सोईने करितां येते, ह्याविषयी पुढे सांग