पान:वनस्पतिविचार.pdf/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

लिंबू, गुलाब, जांभूळ, क्रोटन वगैरेमध्ये दाबाची कलमें करितात. म्हणजे त्याची एक फांदी जमिनीत वाकवून त्यावर माती टाकतात. फांदीचे अग्र नेहमीप्रमाणे हवेत उघडे ठेवावे लागते. जमीन ओली राहील अशी व्यवस्था केली असतां पुरलेल्या फांदीपासून मुळ्या फुटतात. मुळ्या चांगल्या रुजल्या म्हणजे मूळ फांदीचा संबंध तोडून टाकतात. ह्या रीतीने पुष्कळ रोपे तयार करितां येतात, ह्या कलमांत जी फांदी जमिनीत वांकविण्याची असते, त्यावरील एके जागीं अर्धा इंच जागेची साल काढून टाकतात. ह्या योगानें साल काढिलेल्या जागेतून मुळ्या लवकर फुटतात. असल्या कलमास कित्येक लोक जडवे बांधणे म्हणतात,

 जाईमध्ये नैसर्गिक दाबाचे कलम बनते. फांदी वांकविण्याची जरूरी नसून तो आपोआप जमिनीवर टेकून तेथून मुळ्या फुटतात. लिंबू वगेरे वनस्पति मध्ये कृत्रिम कलमें करावी लागतात. हाच काय तो दोहोंतील फरक.

 घायपतीचा बुंधा थोडासा जमिनींत आडवा वाढून नंतर बाहेर हवेत उभा वाढू लागतो. पाने जमिनीवर वाढून त्यांचा गुच्छ बनतो. अशा प्रकारच्या फांद्या जमिनीवर पसरणाऱ्या तृणजातींतही आढळतात. जाईमध्ये खोड प्रथम जमिनीवर वाढून नंतर जमिनींत शिरते पण घायपतीमध्ये ते जमिनीत वाढून नंतर हवेमध्ये वाढते.

 मूळ कोष्ठ Root stock:-कांस, मुंज, नागरमोथी, हळद, आले, वगैरेमध्ये खोडे जमिनीत वाढून त्यांच्या फांद्या बाहेर हवेत येतात. हे खोड जमिनीत असल्यामुळे, त्यास मुळ्या समजण्याचा संभव आहे, पण त्या मुळया नसून खरोखर खोडे आहेत. त्याजपासून फांद्या जमिनीबाहेर वाढतात; शिवाय खाली जमिनीत निराळ्या मुळ्या सुटलेल्या असतात. कधी कधी त्यांचा वाढता कोंब जमिनींत आडवा पसरत जातो. संरक्षक पापुद्रे किंवा आवरणे कोंबावर येतात. पृष्ठभागावर पुष्कळ जागी फांद्या असल्याविषयी सूचक चिन्हें अगर खुणा आढळतात. असल्या खोडामध्यें पौष्टिक अन्न सांठविले असून ते त्यास योग्यवेळी उपयोगी पडते. असल्या खोडास मूळकोष्ठ( Root stock, or Rhizome) हे नांव मूळाशी असलेल्या सादृश्यामुळे पडले आहे. तरवार, फर्न, सालोमनसील वगैरे वनस्पतींची खोडे ह्या वर्गामध्ये पडतात. फांद्या,