पान:वनस्पतिविचार.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४ वे ].    पुनरुत्पत्ति.    २०३
-----

फांदी दुसऱ्या फांदीवर बसवून दोन्हींचा एकजीव करावा लागतो. तेव्हां दोन्हींमध्ये फरक कोठे राहिला ?

 कलमांमध्ये फळे लवकर येऊ लागतात ह्याचे कारण असे आहे की, पूर्णावस्थेस पोंचलेल्या फांदीपासून नेहमी कलमें घेतात; त्यामुळे साहजिक पूर्णदशा पावलेल्या पक्व फांदीवर लवकर फुले येऊन फळे तयार होतात. पक्व फांद्यांचा ऋतुकाल अगोदर पूर्ण झाला असते म्हणून त्यावर जननेंद्रिये लवकर येऊ लागतात; अर्थात पुढे गर्भधारणा होऊन फळेही तयार होतात.

 ज्याप्रमाणे झाडांत कलमें करितात, त्याच प्रकारची कलमें पिकांमध्येही आढळतात. बटाटे शेतांत पेरून त्यांपासून बटाट्याची रोपडी नेहमी तयार करण्यांत येतात; ऊस लावावयाचा म्हणजे उसांची कांडी करून शेतांत पेरतात. रताळीही ह्याचप्रमाणे पेरतात. कांदा, लसूण, अळू वगैरेमध्ये हीच स्थिति असते. म्हणजे वरील सर्व ठिकाणी लहान लहान कोंब अथवा कळ्या पेरून त्यापासून दुसरी रोपे तयार करतात; अथवा ही एकप्रकारची विशिष्ट कलमेच होत. येथेही स्त्रीपुरुषतत्त्वांचा संयोग होण्याची जरूरी नसते.

---------------
प्रकरण २४ वें.
---------------
पुनरुत्पत्ति.
---------------

 वनस्पतिवर्गाची वंशपरंपरा चालू राखणे हे त्यांच्या आयुष्यक्रमांतील एक मोठे महत्त्वाचे कार्य असते. आपल्या चरित्रांतील संकटांचा विचार केला असतां वंश कायम राखण्यास किती अडचणी येतात, याची कल्पना सहज होईल. तसेच त्यांचा जीवनकलह मोठा प्रतिस्पर्धेचा असून, त्यांतून ज्या वनस्पति टिकतात, त्याच पुढे आपलें वंशवर्धन करू शकतात. शिवाय पूर्वी ज्या वनस्पति अस्तित्वात होत्या, त्या हल्ली दिसत नाहीत. पूर्वीच्या वनस्पतींना त्यांची परिस्थित प्रतिकूल होत गेल्यामुळे हळूहळू त्यांचा वंश अजिबात नाहीसा झाला म्हणजे परिस्थितीस योग्य व जीवनकलहांत हार न जाणाऱ्या वनस्पति केवळ अडचणी सोसूनही उत्पत्ति करू शकतात. उच्च प्राणी क्षुद्र प्राण्यास खाऊन