पान:वनस्पतिविचार.pdf/230

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

टाकण्याची नेहमीं भीती असते. तसेंच सशक्त वनस्पति जीवनकलहांत क्षुद्रवनस्पतीस मागे टाकतात. सशक्त वनस्पतीसही वृक्षादनी ( Parastic ) क्षुद्रुवनस्पतिवगांकडून अथवा आळंबीवर्गाकडून भीति असते. लहान कीटक रोपे उगवतांना ते नाहींसे करून टाकतात. पुष्कळ प्राणी वनस्पतीस आपले भक्ष्य समजतात. इतक्या अडचणीमध्ये परिस्थित्यनुरूप ज्या वनस्पति वांचतील तेवढ्याच पुढे वंशवर्धन करितात. ' योग्यायोग्य ' व योग्याचीच संगोपना हीं तत्त्वें वनस्पतिजीवनोत्कांतीमध्येसुद्धा आढळतात.

 उत्पत्तिकार्य स्त्रीपुरुषसंयोगामुळे उत्पन्न होणाऱ्या बीजाकडून होते; अथवा क्षुद्रवर्गातील विशिष्ट जननपेशींकडून ( Spore ) होते. तसेच वनस्पतीच्या शरीरातील काही भागांकडून म्हणजे कलमादिकांकडून उत्पत्ति होते. दुसऱ्या दोन्ही प्रकारांत स्त्रीपुरुषतत्वसंयोगाची जरुरी नसते. एकंदरीत उत्पत्तिकार्य फार महत्त्वाचे असुन, जड़पदार्थ व सजीव पदार्थ ह्यांमध्ये स्पष्ट भेद दर्शविणारे परमेश्वरी सत्य आहे असे समजले पाहिजे. जड़पदार्थापासून कधीही उत्पत्ति होत नाही. पण सजीव पदार्थात ' उत्पत्ति ' हे अंतिम साध्य असते.

 कांहीं क्षुद्रवनस्पतींमध्ये उत्पत्तिकार्य साधे असते. किण्व ( Yeast ) वनस्पति एकपेशीमय असून ती वाढत वाढत मोठी होते, तिची एक बाजू ज्यास्त फुगून तीस दोन वाटोळ्या पेशींसारखा आकार येतो. हा आकार येणे म्हणजे उत्पत्तिकार्यास सुरुवात होणे होय. ही वाटोळी नवीन पेशी पूर्वीसारखी होऊन मूळ पेशीपासून अलग होते. वाढ व उत्पत्ति हीं सारखीच असतात, पण जेव्हां पेशी वेगळी होऊन स्वतंत्ररीतीने जीवनकार्ये करू लागते, तेव्हां उत्पत्ति झाली असे म्हणतात. कधी कधी ह्या वनस्पतींमध्ये सुद्धा स्त्रीपुरुषतत्वसंयोग होऊन उत्पत्तिकार्य घडत असते. पण अशी स्थिती विशेषेकरून पोषक द्रव्ये कमी असतांना दृष्टीस पडते. नाही तर साधारणपणे येथे ‘कळी सोडून ' च ( Budding ) उत्पत्तिकार्य घडते.

 प्लूरोकोकस ( Pleurococcus ) नांवाची एक हिरवळ एकपेशीमय वनस्पति आहे. तिचा जीवनक्रम किण्व ( Yeast ) वनस्पतीपेक्षा अगदी वेगळा असतो. हवेतून कॉर्बन वायु शोषण करण्याची शक्ति, हरितरंजकामुळे तिजमध्ये असते, येथे पेशीमध्यें, आडवा पडदा उत्पन्न होऊन एका पेशीचे