पान:वनस्पतिविचार.pdf/192

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

उपयोगी पडतात. कणाच्या ओशटपणामुळे एकदां कण परागवाहिनीस चिकटला म्हणजे पुनः निघून जाण्याची भीति नसते. तसेच रंध्रे अगर खांचा असल्यामुळे परागकणांतून सजीव तत्त्वामुळे एक नळी तयार होते. ही नळी परागवाहिनींत वाढत जाऊन पुढील रस्ता सोपा व सुलभ होतो. परागकणाच्या खरखरीतपणामुळे किडे अगर फुलपांखरे जेव्हा फुलांवर बसतात, त्यावेळेस कण सहज चिकटून ते दुसऱ्या फुलाकडे नेले जातात. तेलकट व चिकटपणा अशा वेळेस फारच उपयोगी पडतो.

 स्त्रीकोश-( Gynoecium ) ह्या वर्तुळामध्ये बीजोत्पत्ति होते, म्हणूनच ज्या फुलांत ह्या वर्तुळाचा अभाव, त्यामध्यें बीजोत्पत्ति नाहीं. हें वर्तुळ नेहमी फुलांतील मध्यभागी असते. ज्याप्रमाणे मुख्य राजासभोंवती परिवारगण संरक्षणाकरितां असतो, त्याप्रमाणे फुलांत हे वर्तुळ मुख्य असून चारी वाजूंनी इतर परिवारगण वर्तुळांना संरक्षिले जाते. बाह्यवर्तुळे झाल्यावर पुंकेसर वर्तुळरूपी चौकी लागते; मागाहून मुख्य राणीसाहेबांचा महाल लागतो. हें वर्तुळ सर्वांत नाजूक असून त्याचे कामही फार नाजूक असते.

 ह्या वर्तुळांत स्त्रीकेसरदल (Carpel), बीजाण्डे (Ovules), अण्डाशय ( Ovary ), परागवाहिनी ( Style ) व त्यावरील अग्र (Stigma ) इतक्या गोष्टी लक्ष्यांत ठेविण्याजोग्या आहेत, स्त्रीकेसरदल (Carpel ) म्हणजे अण्डाशयास आच्छादन करणारा पडदा होय. तसेच स्त्रीकेसरदलाकडून जी परिवारित मध्य पोकळी बनते, त्यासच अण्डाशय (Ovary ) म्हणतात, म्हणूनच जितकी स्त्रीकेसरदलें असतात, तितकेच अण्डाशय असतात. प्राणि वर्गात अण्डाशय एक अगर दोन असतात; पण वनस्पतिवर्गात त्यांची संख्या स्त्रीकेसरदलांवर अवलंबून असते. नाळेस बीजाण्डे (Ovules ) चिकटलेली असतात. स्त्रीकेसरदलाचे अग्रवाढून त्याची परागवाहिनी ( Style ) बनते, व तिचेच टोक पेल्यासारखे होते. परागकण स्त्रीकेसराग्रांवर (Stigma ) पडून परागवाहिनीतून रस्ता काढीत बीजाण्डाकडे जातात. पुष्कळ वेळां परागवाहिनी ( Style ) असत नाहीं.

 स्त्रीकेसरदलांची संख्या वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे स्त्रीकेसरदले सुटी अगर संयुक्त असतात. बाभूळ, भुयमूग, तूर, उडीद वगैरेमध्ये स्त्रीकेसरदल एक असते. सूर्यकमळ, झेंडू, गहू, बाजरी वगैरेमध्ये स्त्रीकेसरदलें दोन असून