पान:वनस्पतिविचार.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

वनस्पतीची पचनक्रिया नेहमी बहुतकरून पेश्यंतर होत असते. क्वचित् क्वचित प्रसंगी ही क्रिया पेशीबाह्य घडते, म्हणजे अन्नशोषण करण्याचे पूर्वी त्यावर पाचक आम्लाचा परिणाम होऊन पचनक्रिया बहुतेक बाहेर घडते नंतर पचन क्रियेने उत्पन्न केलेले पदार्थ शरीरांत शोषिले जातात. आळंब्या वर्गात बहुतेक अनशोषणक्रिया बाह्य होऊन नंतर ते अन्न शोषिलें जाते. पेश्यंतर होणारे पचन पुष्कळ अंशी क्षुद्रप्राण्याच्या पचनासारखे असते. वनस्पतिशरीरातील सजीव तत्त्व असल्या पचनक्रियेस चालून देते, त्यामुळे पचनक्रिया सेंद्रिय पदार्थांवर होऊन त्या पदार्थांमध्ये असणारी गुप्त शक्ति व्यक्त होऊन वनस्पतीचे इतर व्यवहार चालू राहतात. सात्त्विक सेंद्रिय पदार्थांवर तसेच नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थांवर पचनक्रिया करणारे पाचक रस वेग वेगळे असतात. ह्या रसापासून संकीर्ण पदार्थ साधे होऊन पचविण्यास योग्य होतात. संकीर्ण वस्तू साधी होणे व साधी वस्तू संकीर्ण होणे, म्हणजे ' वस्तूविघात' व ' वस्तुघटना' ही दोन्हीं कार्ये सजीव तत्त्वाच्या चपलतेवर अवलंबून असतात; व जेथे घटना होते, त्याबरोबरच दुसरीकडे अन्य वस्तुंची विघटना असावयाचीच, व ही दोन्ही कार्ये बरोबरच होत असतात.

 पाचकरस विशेषेकरून अंधारांत अथवा मंद उजेडात आपलें पचन काम झपाट्याने चालवितो. अती कडक उन्हांत त्याची पचनक्रिया मंदावते. जेथे जेथे पोषक अन्नांचा साठा असतो, त्याठिकाणी असल्या रसाचे अस्तित्व असते. जर तेथे तयार रस नसेल तर विशिष्ट पिंडांची योजना असते. हेतू एवढाच की, ज्यावेळेस जरूरी असेल, त्यावेळेस ताबडतोब पाचक रसाचा उपयोग होऊन पचनक्रिया पूर्ण व्हावी. बीजें, कंद, पाने, किंवा मुळ्या ह्यांमध्ये रसाची योजना असते. ह्यांमध्ये सांठविलेले सेंद्रिय पदार्थ लवकर पचविले जाऊन त्याचा उपयोग शरीरसंवर्धनाकडे होत असतो. मांसाहारी वनस्पतीमध्ये पाचकरस बाहेरचे अंगास येऊन आपले भक्ष्याचे पचन करून त्यांतील पौष्टिक पदार्थ आंतील अंगास द्रव्यस्थितीत आणण्याची व्यवस्था होते, मक्याचे दाण्यांत गर्भ व पौष्टिक अन्न ह्यांचे दरम्यान बीजदलाचा विशिष्ट पडदा ( Scutellum ) असतो. ह्या पडद्यास बीजदल ( Coty Ledon ) असे संबोधितात. मका किंवा त्यासारखी इतर बीजे ह्यांमध्यें