पान:वनस्पतिविचार.pdf/153

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१५ वे ].    पचन, वाढ व परिस्थिति.    १२५
-----वनस्पति बाटलीत बूच घालून दुसरे गांवीं पाठावतात; पण असे पाठविणे फार धोक्याचे असते. कारण ह्यामुळे वनस्पतिची श्वासोच्छ्वास क्रिया बंद होऊन आंतलेआंत त्या मरून जाण्याची भीति असते. बाटलीस घट्ट बूच असल्यामुळे बाहेरील शुद्ध हवा मिळणे शक्य नसते. ह्याचा परिणाम श्वासोच्छ्वास क्रियेवर होऊन शेवटी ती वनस्पति मरते; म्हणून अशा रीतीने न पाठवितां मोकळ्या हवेची तजवीज करून वनस्पति पाठविली पाहिजे.

---------------
प्रकरण १५ वें.
---------------
पचन, वाढ व परिस्थिति.
---------------

 वनस्पतिशरीरांत उत्पन्न होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर पाचकतत्त्वाचा परिणाम होऊन त्यांची 'ने-आण' चांगली होते. न विरघळलेल्या स्थितीत पदार्थ पेशीपासून दुसऱ्या पेशीत जाणे मुष्कलीचे असते. त्यास अवश्य द्रवस्थिति पाहिजे तेव्हां कोठे पेशीभित्तिकेंतून रस्ता मिळतो. जेथे सेंद्रिय द्रव्ये सांठविली जातात, तेथून ती दुसरीकडे न्यावयाची असली तर त्यांवर प्रथम सजीवतत्त्व पाचकशक्तीचा उपयोग करून त्यास विरघळविते, व द्रव्यस्थितीत दुसरीकडे पाठविते. सजीवतत्त्वास ही जरी शक्ति असते, तथापि वनस्पतिशरीरांत निराळे पाचकरस ( Enzimes ) तयार असतात. सजीवतत्वामुळे कांहीं विशिष्टपिंडांस असे, रस उत्पन्न करण्याची शक्ति असते. जेथे जेथे व जेव्हा जेव्हां जरूरी असते, त्यावेळेस त्या ठिकाणी हा पाचकरस उत्पन्न होऊन पचनकार्य घडत असते. जेव्हां सजीवतत्वास हा पाचकरस स्वतः उत्पन्न करावयाचा असतो, त्यावेळेस त्यास कणीदार आकार येतो. कणीदार भागाचे पुष्कळ फरक होत होत पाचकरस उत्पन्न होतो. ज्याप्रमाणें पेशीभित्तिका सजीवतत्त्वाच्या घटकद्रव्यांतून बनते, व ती बनतांना जसे जसे जीवनकणांत फरक होत जातात, तद्वत्च हा पाचकरस उत्पन्न होतांना जीवनकणांमध्यें फरक होत असतात.