पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      कुडा.      १९

-----

धरावे लागतात, नाहींपेक्षा आंबीने कपड्यांचे तुकडे पडतात. सबब आंब धरणे ती फार सावधगिरीनें खालील कृतीने धरावीः-

 हरभऱ्याचे झाडांना घाटे धरू लागले म्हणजे अरुणोदयापूर्वी उठून स्वच्छ कापडाचे मोठेमोठे रुमाल पाण्यात भिजवून चांगले पिळून काढावे, व झटकून मोकळे करावे; आणि एका लांब कळकाचे काठीचे शेवटास रुमालाचे एक टोंक बांधून ती काठी हातांत धरून हरभऱ्याचे झाडांपासुन तो रुमाल फिरवावा. म्हणजे त्या झाडावरील दंवाचे योगाने धरलेल्या आंबीने रुमाल चांगला भिजतो. तो काचेचे पात्रांत पिळून घेऊन पुन्हां झाडांवरून फिरवावा, अशा तऱ्हेने आंब धरून ती बाटल्यांत भरून ठेवावी. कोणी कोणी रुमाल प्रथम पाण्यांत न भिजवितां कोरडाच काठीला बांधतात. असे केल्याने आंबीत, पाण्याचा अंश येत नाही. तसेच कांहीं लोक रुमाल रात्रीच झाडावर टाकून ठेवतात व सकाळी त्यांतील आंब पिळून घेतात. आंबीने भिजलेले रुमाल पिळणे ते हाताने न पिळतां चिमट्यानें अगर कामटीने धरून पिळावे. हाताने पिळल्यास वर सांगितल्याप्रमाणे हाताला घरे पडतात. आंबीचे औषधी उपयोग वर सांगितले आहेतच; शिवाय आंबीची पांच सात पुटे दिलेले कोणतेही बी, जमिनीत पेरून त्यावर पाणी शिंपलें असतां, ते बी चार घटकेत रुजते, गारुडी लोक कधी कधी असले प्रयोग करून लोकांस आश्चर्यचकित करून सोडतात.

--------------------
१३ कुडा.

 कुड्याची झाडे कोंकण प्रांतीं पुष्कळ आहेत. कुड्याचे झाडाचा कोणताच भाग फुकट जात नाही. कारण त्याचे मूळ, पान, फूल, साल, लाकूड आणि बीं हीं सर्व निरनिराळ्या प्रकारांनी मनुष्याच्या उपयोगी पडतात. यावरून कुड्याचे झाडाचा जन्म केवळ परोपकारासाठीच आहे, असे म्हणावे लागते. कड्याचे मूळ लहान मुलांना घुटींत उगाळून देतात, त्या योगाने मुलांना जंतांचा उपद्रव होत नाही. अतिसारादि विकारांवर कुडेपाक फारच गुणकारी असल्याचे शारङ्गधरातील खालील उताऱ्यावरून दिसून येते.

  तत्कालाकृष्टकुटजत्वचं तंदुलवारिणा ॥
  पिष्टां चतुःपलमितां जंबुपल्लववेष्टिताम् ॥
  सूत्रेण बद्धां गोधूमं पिष्टेनोपरिवेष्टिताम् ॥
 लीप्तां च घनपंकेन गोमयैर्वह्निना दुहेत् ॥
  अंगारवर्णा च मृदं दृष्ट्वा वहेः समुद्धरेत् ॥