पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/537

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२० लो० टिळकांचे केसरींतील लेख. पेक्षा कर्म श्रेष्ठ हा सिद्धांत होय. * तस्मात् ? ज्ञानी पुरुषानेंही निष्कामबुद्धीनें कर्म केले पाहिजे, असा गीर्तेत सिद्धात असून त्याचप्रमाणे लागलीच अर्जुनास उपदशही केला आहे. गीतेतच नव्हे, योगवासिष्ठातही हा अर्थ स्पष्ट केला आहे. अर्जुन अज्ञानी म्हणून त्यास निष्काम कर्म करण्यास सांगितलें ही कोटि ग्राह्य धरिता येत नाही. असेो, कर्म करण्यास शेवटचे म्हणून जे कारण सागितले आहे तें लोकसंग्रह होय. लोकसंग्रह म्हणजे अडाणी लोकांस न दुखविण्यासाठी त्याच्याप्रमाणें वागण्याचे सोग करणे असा अर्थ नाहीं. व्यावहारिक कर्म कशी करावयाची याचा लोकास प्रत्यक्ष आपल्या निष्काम वर्तनाने धडा घालून देऊन केवळ पृथ्वीवरील लोकाचीच नव्हे तर देवादि लोकाचीही (अ० लोक ११ ) सुस्थिति उत्तरोत्तर वृद्धिंगत व कायम करणे, हा लेोकसग्रहाचा खरा अर्थ होय. साधूंचे सरक्षण व दुष्टाचा निग्रह--‘परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम्'- हा त्यातलाच एक भाग आहे; व तो करण्यासाठी खुद्द भगवानहि जर वेळेोवळी अवतार घेतात, तर ज्ञानी पुरुषार्नही तेंच काम करून लोकसंग्रह केला पाहिजे, असा गीतेतील उपदशाचा इत्यर्थ आहे. साराश, * कर्म मोक्षाला कारण होत नाहीं, ज्ञान हेंच मोक्षाचे कारण आहे. ज्ञानाचा उजेड पडल्यावर कर्माचा अंध:कार त्या ठिकाणीं राहू शकत नाहीं, ' इत्यादि जो संन्यासपक्षीयाचा कोटिक्रम आहे ता भगवद्गीतेत स्वीकारलेला नाहीं. मोक्ष ज्ञानानेंच मिळती हैं। तत्त्व भगवद्गीतेस मान्य आहे. पण मनुष्य कितीही मोठी ज्ञानी किंवा भगवद्भक्त झाला तरी निष्काम कर्म त्याला सुटत नाहीं; मोक्षाकरिता नको असले तरी लोकसग्रहार्थ त्याने तें अवश्य केल पाहिजे, असें भगवद्गीतेचे विशेष सागणें आहे. किबहुना मनुष्य ज्ञानी झाला म्हणजे अज्ञानी जनास निष्काम कर्म करण्याची प्रत्यक्ष उदाहरणार्ने संवय लावून देण्याची एक नवीन जबाबदारी त्याचेवर पडते असे * यद्यदाचरति श्रेष्ठः ’ या ठेकाचे तात्पर्य आहे म्हटले तरी चालेल. निरनिराळे आचार्य आपापल्या भाष्यातून असा अर्थ करीत नाहीत हें मला माहीत आहे, व हे आचार्य मोठे विद्वान्, धार्मिक व सत्त्वशील होते, हेही मला मान्य आहे. विशेषतः श्रीशंकराचार्यासारखा तत्त्वज्ञानी पुरुष आजपर्यंत या जगांत झाला नाहीं असे मी समजता, व शाकरभाष्यात प्रतिपादन केल्याप्राणें गोर्तेतील वेदातही अद्वैतपरच आहे असे माझे मत आहे. पण निरानराळ्या आचार्याचे मत काय आहे हे आपणास सध्या पाहावयाचे नसून सांप्रदायिक दृष्टि सोडली तर गीतेचे अखेर ध्येय काय ठरतें, एवढाच आपल्यापुढचा प्रस्तुत प्रश्न होय. म्हणून या बाबतीत अनेक आचायांशीं माझा मतभद असल्यास त्यावरून या आचायाँस मी कमी पूज्य समजतो, असें कोणीही समजूं नये. याला उत्तम उदाहरण म्हटलें म्हणजे आचार्याच्या मागून त्याच्या साप्रदायिक अनुयायानाही आपापल्या टीकांत प्रसंगानुसार निरनिराळे अर्थ केले आहेत हें होय. किंबहुना गीतेचे असे अर्थ करण्यास सवड नसती, तर गीतेवर अनेक टीका होणेही शक्य झाले नसते.