पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/535

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१८ लो० टिळकांचे केसरींतील लेख. लागणार; आणि न करावें तर क्षात्रधर्म सुटल्यामुळे तिकडूनही नरकवास प्राप्त होणार. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर, अशी स्थिति झाल्यावर तो श्रीकृष्णास शरण गेला आणि श्रीकृष्णांनीं गीता सांगून त्याला ताळ्यावर आणिला व युद्ध करण्यास लावलें, हा गीतेचा उपसंहार आहे. हा उपसंहार केवळ वाचनिक किवा ग्रंथांत लेखी आहे, इतकेंच नव्हे तर पुढे तसा साक्षात् परिणामही घडलला आहे. तसेंच सबंध ग्रंथात जागोजाग अनेक कारणें सागून * तस्माद्युद्धस्व भारत ’ * हे अर्जुना, म्हणून तूं युद्ध कर '-असा उपदेश केलला आहे. यांतील ‘म्हणून हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा असा अर्थ होतो कीं, निरनिराळीं कारणे दाखवून अनेक बाजूंनीं**या वेळीं युद्ध करणें हेंच तुझें कर्तव्य होय”या सिद्धान्ताबद्दल अर्जुनाची न्यायदृष्टया खात्री करून दिली आहे. अर्जुनानें संन्यास ध्यावा किंवा सर्वकाल भक्तीत गढून राहून दुसरें काहीं करूं नये, असे श्रीकृष्णाच्या मनातून त्यास सांगावयाचे नव्हतें. तसे असतें तर गीता सांगण्याचीच जरूरी नव्हती, कारण अर्जुन संन्यास घेण्यास तयारच झाला होता; तेव्हा ** तूं म्हणतेस तसेच माझे मत आहे, आपण दोघेही संन्यास घेऊन आपल्या आत्म्याचे कल्याण करूं' असें उत्तर दिल्यानें काम भागत होतें. पण तसे काहीं एक न करता * हा हिजडपणा (छैब्य) तुला शोभत नाहीं ? अशी दुस-या अध्यायाच्या आरंभीं श्रीकृष्णानीं त्याची निभेत्सना केली आहे. यावरून गीतेचे जर काही तात्पर्य असेल तर ते अखेर प्रवृत्तिपर म्हणजे कर्मपरच असले पाहिजे असें उघड होते. भक्तीत किंवा ज्ञानांत गढून जाऊन सर्व कर्माचा स्वरूपतः संन्यास करणे हे मत गीर्तत प्रतिपाद्य असणें शक्य नाहीं. गीतेच्या उपक्रमेोपसंहारावरून गीतेच्या तात्पयांचा जो निर्णय केला त्याचे उपपादन गीतेच्या अठरा अध्यायांत कसे केले आहे, हे आतां आपण पाहूं. पैकी पहिलें पाच अध्याय प्रथम ध्या. यातील पहिल्या अध्यायाचे तात्पर्य वर सांगितलेच आहे. दुस-या अध्यायांतील “ अशोच्यानन्वशोचस्त्वम्” येथपासून भगवंताच्या उपदेशास सुरवात झाली आहे; व यांतील पहिले काहीं छेक वेदान्तपर असल्यामुळे गीतेंत हाच वेदान्त प्रतिपाद्य आहे, असे कित्येक समजतात ! पण खरा प्रकार तसा नाहीं, असें थोड्या सूक्ष्म विचारांतीं दिसून येईल. * अशोच्यानन्वशोचस्त्त्वम् ? येथपासून * एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धियोंगे विमा श्रृणु ’ येथपर्यंत सांख्यमागांचे ज्ञान सांगून पुढे याच अध्यायांत योगाचे म्हणजे कर्मयोग मागांचे ज्ञान सागण्यास सुरवात केली आहे; म्हणजे गीतेतील उपदेशास सांख्य व कर्मयोग या दोन मार्गापासून सुरवात आहे, नुसत्या वेदान्तापासून नाहीं, असें निष्पन्न होतें. युद्ध सोडून देऊन सांख्यमागौतील संन्याशप्रमाणे भिक्षा मागत रानांत राहूं किंवा युद्ध करूं ? ज्ञानी पुरुषास यापक उचित काय ? हा अर्जुनाचा प्रश्न होता. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या आचरणाचे