पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/534

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभगवद्गीतारह्रस्य. ५१७ अंतरंगपरीक्षणांत ग्रंथाचे तात्पर्य ठरविण्यांत येतें; आणि बहिरंगपरीक्षणांत ग्रंथ कोणीं, कोठे व केव्हां केला, त्या ग्रंथांत दुस-या कोणत्या ग्रंथांचा उल्लेख आला आहे, इत्यादि बाह्यांगाचाच विचार करीत असतात. माझ्या गीतारहस्यांत या दोनही प्रकारें गीतेचा विचार केलेला आहे. पण या लेखांत फक्त अतरगपरीक्षणाबद्दलच माहिती दिली आहे; कारण बहिरंगपरीक्षण ऐतिहासिक दृष्टया जरी महत्त्वाचे असले, तरी ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिक, नैतिक वगैरे अनेक दृष्टींनीं अंतरंगपरीक्षण म्हणजे ग्रंथ-तात्पर्य-निर्णयच सर्व लोक अधिक महत्त्वाचा समजतात, व सध्याच्या कालीं तर तो विशेष महत्त्वाचा आहे. कारण वरील द्वैती, अद्वैती वगैरे पंथाखेरीज कांहीं मिशनरी लोक गीता अत्याचारास प्रवृत्त करणारी आहे अशीही दीर्घ शंका आता काढू लागले आहेत. ही शका खोटी व सर्वस्वीं निर्मूल होय असे पुढील विवेचनावरून दिसून येईल. गीतेतच काय पण सामान्य हिंदूधर्मासही अत्याचाराचे प्रकार केव्हांच मान्य झालेले नाहीत व ते मान्य असणें शक्यही नाहीं. असेो; गीता महाभारताचे एक आवश्यक अंग आहे किंवा त्यांत घुसडून दिलेली आहे; अथवा मूळ गीता लहान असून त्यांत प्रसंगाप्रमाणें मागाहून अनेकांनीं अनेक क्षेपक छेोक घातलेले आहेत, आणि असल्यास ते कोणते, इत्यादि प्रश्न या बहिरंगपरीक्षणाच्या वर्गातच पडतात. पण त्याचा सविस्तर विचार या लेखांत करणे शक्य नाहीं, म्हणून माझ्या मर्ते या सर्व शंका निर्मूल होत, आणि इल्लींचा गीता-ग्रंथ पौराणिक पद्धतीनें व संवादरूपानें लिहिला असला तरी ती सुसंगत असून त्यांतील सर्व विषय शास्रीय प्रतिपादनास आवश्यक आहेत, एवढा माझा सिध्दान्त येथे सागून अंतरंगपरीक्षणाच्या मुख्य विषयाकडे वळतें, एखाद्या ग्रंथाच्या तात्पर्याचा निर्णय कसा करावा याबद्दल आधुनिक ग्रंथपरीक्षाशास्त्रज्ञांनी जे नियम घालून दिले आहेत ते काहीं नवीन नाहीत. आमच्या मीमांसकानी हजारों वर्षापूर्वी असें ठरविलें आहे कीं, ‘ कोणत्याही ग्रंथाचे तात्पर्य ठरविण्यास ( १ ) त्या ग्रंथाचा आरंभ व शेवट कसा आहे, (२) त्यांत वारंवार काय सांगितले आहे, (३) त्यात अपूर्वता कोणती, (४) त्याचा परिणाम किंवा फल काय घडलं, (५) त्यांत उपपात कोणती सांगितली आहे, आणि (६) या उपपत्तीच्या दृढीकरणाथै किंवा अन्य कारणासाठी दुस-या कोणत्या कोणत्या प्रासंगिक गोष्टी त्यांत आहेत, या सहा गोष्टींचा विचार करून ग्रंथाच्या तात्पयांचा विचार केला पाहिजे. ग्रंथतात्पर्यनिर्णयाची मीमासकांची ही कसोटी गीतेस लावून गीतेचा आरंभ व शेवट काय हें पाहूं लागले, म्हणजे असे दिसून येतें कीं, भारती युद्धाच्या आरंभीं समेोर आलेल्या बाधवांस पाहून अर्जुनास आपल्या कर्तव्याचा मोह पडला अशी गीतेची सुरवात आहे. युद्ध करावें तर कुलक्षय होणार, इतकेंच नव्हे तर पितामह भीष्म व गुरु द्रोण यांचा वध करावा