पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४ ३७ पैकी पहिली गोष्ट म्हटली म्हणजे महाभारताची ग्रंथरचना अर्थात् हा ग्रंथ कसकसा तयार होत गेला ही होय. यासंबंधे चिंतामणराव यांनीं जे सिद्धांत व अनुमानें काढिली आहेत तीं बहुतेक आम्हांस ग्राह्य आहेत. कांहीं ठिकाणीं थोडासा मतभेद आहे तो खालील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत येईल. महाभारत हल्लीं ज्या स्थितीत आहे त्या स्थितींत पहिल्यानेंच रचले गेले नसार्वे हें त्या ग्रंथाच्या नावावरूनच उघड होत आहे. भरतकुलांतील पुरुषांचा इतिहास ज्यामध्यें आहे त्या ग्रंथास व्याकरणरीत्या सामान्यत: * भारत ? येवढच नांव पुरेसें आहे. * रामायण ? * भागवत ? हीं नावें * महा ? हें विशेषण न लावतांच ग्रंथास दिली गेली आहेत. अर्थात् * भारत ? एवढेच नांव पहिल्यार्ने लिहिलेल्या इतिहासास दिले गेलें असले पाहिजे. आणि हें जर खरें असेल तर * भारताचे ’ **महाभारत?' कोणी केलें हा प्रश्न सहजच उद्भवतो. हा प्रश्न उद्भवण्यास दुसरें कारण असें आहे कीं, आश्वलायन गृह्यसूत्रांत सांगितलेल्या तर्पणांत * सुमंतुजैमिनि-वैशंपायन----पैलसूत्रभाष्य---भारत---महाभारत---धर्माचार्यास्तृप्यंतु ’ असा संकल्प आहे; व त्यावरून आश्वलायनाला * भारत ? आणि * महाभारत ’ असे दोन पृथक् ग्रंथ माहीत होते असें उघड होतें. इतकेंच नव्हे तर सुमंतु, जैमिनी, वैशंपायन, आणि पैल या सर्वाची निरनिराळीं भारतें त्यांच्या वेळीं प्रचलित असावी असेही वरील संकल्पावरून अनुमान होतें. महाभारतांतील आदिपर्वाच्या ६३ व्या अध्यायात (ठीक ८८ -९० कलकत्ता प्रत) विव्यास वेदान् यस्मात्स तस्माद् व्यास इति स्मृतः वेदानध्यापयामास महाभारत पंचमान् ॥ सुमन्तुं जैमेिनं पैलं शुक्रं चैव स्वमात्मजम् । प्रर्भुर्वरिष्ठो वरदो वैशेपायनमेव च ।। संहृितास्तैः पृथक्त्वेन भारतस्य प्रकाशिताः । याप्रमाणें लोक असून त्यावरून व्यासानीं पहिल्यानें सुमंतु, जैमिनि, पैल, शुक्र आणि वैशंपायन यांसं भारत सांगितले व त्यापैकीं प्रत्येक शिष्यानें निरनिराळी भारताची संहिता प्रसिद्ध केली असे स्पष्ट होतें. * भारतस्य संहिताः ’ या पदांचा अर्थ टीकाकारांनीं व मराठी भाषांतरकारांनीं चुकीचा केला आहे. पण रावबहादूर वैद्य यांनीं तो सोडून देऊन * भारतस्य संहिताः ? याचा सरळ अर्थ महाभारत ग्रंथ असाच केला आहे. * व्यासस्य संहिताः ? असें पद महाभारत ह्या अर्थी आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायाच्या आरंभचि आलेले आहे; त्यावरूनही हाच अर्थ सिद्ध होतो. शिवाय जैमिनीनें एक भारत केलें होतें; पण तें बुडून जाऊन त्यांतील अश्वमेधपर्व मात्र शिल्लक राहिलें अशी जी कथा आहे तिचीही यामुळे संगति लागते. व्यासानें सांगितलेल्या एका भारताची भिन्न भिन्न पांच भारतें किंवा पांच निरनिराळ्या आवृत्त्या एकदा प्रचलित होत्या असे मानिले म्हणजे मग भारत हा एकच ग्रंथ होता असे म्हणण्यास कांहीं आधार रहाँत नाहीं.