हल्ली जी भारताची प्रत उपलब्ध आहे ती वैशंपायनाची प्रत आहे. तथापि, वैशंपायनाने जनमेजयास जे भारत सांगितलें ते तर्सेच आज आमच्या दातांत आहे कीं नाहीं याची शंका आहे. कारण हल्लीच भारत लोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रव सौति पुराणिक याने शौनकास सांगितले असे ग्रंथाच्या आरंभीच म्हटले आहे. वैशंपायनाने जनमेयास जी गोष्ट सागितली तीच अक्षरशः सौतीने शौनकास सांगितली असावी असें वाटत नाहीं. कारण एक तर त्या वेळीं हा ग्रंथ समग्र लिहिला गेला नसावा; आणि दुसरें असे कीं, दलांच्या महाभारताच्या प्रतीत चिंतामणराव म्हणतात त्याप्रमाणे पुष्कळ प्रश्न असे आहेत की, ते सौति व शौनक यांच्या दरम्यानच लागू पडतात. अर्थात् जनमेजयाचे ते प्रश्न वैशंपायनास विचारण्याचा संभव नाही. अशाच दृष्टीने जरा जास्त विचार केल असता असे आढळून येतें कीं, वैशंपायन व जनमेजय यांच्या दरम्यानचे काही प्रश्नही जनमेजयाच्या वेळींच नवीन उपस्थित झाले असावेत आणि व्यासांन वैशंपायनास सागितलेल्या मूळ भारतांत त्यांचा समावेश झालेला नerवा. ही परंपरा लक्षात आणली म्हणजे ( सुमंतु, जैमिनी यांची भारतें सोडून दिलीं तरी ) इल्लीं उपलब्ध असलेले महाभारत व्यास, वैशंपायन आणि सौति या तिघांच्या कृतीचे असावे असे मानणें भाग येते. सौतीच्या भारताची पत्रे अठरा आहेत, पण हा सर्वाचा विभाग एकदा निराळा असून भारताच्या अनुक्रमणिकेत शंभर पर्ने होती असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायात ( श्लोक १०१।१०२ )
असा उल्लेख आहे. त्यावरून एक ग्रंथाचे चोवीसहजार व अनुक्रमणिकेचे दीडशे लोक एवढाच मूलग्रंथ असून तो उपाख्याना विरहित असल्यामुळे त्यास नुसते भारत म्हणत असे दिसून येते. याच प्रकरणात पुढे विस्तृत भारताचे वर्णन असून त्याचे तीस लाख देवलोकीं, पंधरा लाख पितृलोकीं, चवदा गंधर्व- लोकीं व एकलक्ष मनुष्य लोकांत उपलब्ध आहे. असे म्हटले आहे. पैकीं एक लाख ' मयोक्त वै निबोधत' असे सौतीने म्हटले आहे. यावरून चोवीस हजा- राचें भारत वाढवून सौतीनें एक लक्ष भारत केले असे रा. ब. वैद्य यांचे अनु- मान आहे. पण हे अनुमान आम्हांस बरोबर दिसत नाहीं. वैशपायनाचे भारतच जवळ जवळ एक लक्ष असावें असें इतर पर्वातील उल्लेखांवरून दिसून येते. सौतीनें त्यात कांहीं फेरफार केले आहेत हे उघड आहे. पण भारतास महा- भारताचे रूप सौतीच्या पूर्वीच प्राप्त झाले असले पाहिजे; एरव्हीं महाभारत या शब्दाची सरळ व्युत्पत्ति सोडून ' महत्वाद् भारवत्वाच्च अशी वेडीवाकडी