पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/432

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंराठी भाषेचा उत्कर्ष. ४ १७ व्यवहारांतील व ग्रंथांतील मराठी भाषेत जें सौष्ठव, मार्मिकपणा, भारदस्तपणा, प्रौढता, शब्दसामुग्री, वैचित्र्य, सुबोधपणा वगैरे अनेक चांगले गुण दिसतात, त्याला पुष्कळ अंशानें निबधमाला, विविधज्ञानविस्तार वगैरे मासिक पुस्तके व हल्लींचीं मुख्य मुख्य वर्तमानपत्रे ह्यातील लेखच कारणीभूत झाले आहेत हें केोणीही समंजस माणूस कबूल करील. कैलासवासी बाळशास्री जाभेकर, भाऊ महाजन, विष्णुशास्री चिपळूणकर, गोपाळराव देशमुख, प्रो. आगरकर, हरीपंत पंडित वगैरे प्रसिद्ध लेखकाचे लेख मुख्यत्वें करून वर्तमानपत्रे व मासिक पुस्तकें ह्यातूनच प्रसिद्ध झाले आहेत, हे ज्यास माहीत आहे, ते बर्डबुडसाहेबाचा वरील सिध्दान्त पोरकट म्हणतील ह्यात शका नाहीं. वर्तमानपत्रांतील लेख बहुधा तात्पुरते व प्रासंगिक असल्यामुळे त्याना स्वतंत्र ग्रंथाप्रमाणें चिरकालीनता कधीही येणार नाही, हें उघड आहे, तथापि इंग्लंडात डॉ. जेंॉनसन्, डीन, स्विफ्ट, अॅडिसन, स्टील, मेकॉले, ज्युनीयस कालरीज वगैरे प्रसिद्ध ग्रंथकाराचे सर्वमान्य लेख प्रथम वर्तमानपत्रातूनच प्रसिद्ध झाले; व येथेही चिपळूणकर, आगरकर वगैरे लेखकानी त्याच द्वाराने स्वभाषेची सेवा केली आहे हें पाहिले तर चागलीं वर्तमानपत्रं भाषावृद्धीचे व ग्रंथोत्पत्तीचे एक मोठे साधन आहे हें कोणीही कबूल करील. असो. बर्डवुडसाहेबाचे मत चुकीचे असले तरी विलायततही मराठी भाषेबद्दल कळकळ बाळगणारे काहीं लोक आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. व त्यावरून आम्हीं पुष्कळ बोध घेतला पाहिजे. बर्डवुड पोलनसाहेबासारखे विदेशी लोक मराठी भाषविपयीं जर इतकी कळकळ दाखवितात तर आमच्यातील सुशिक्षित पुढारी लोकानी स्वभाषेची अभिवृद्धी करण्याकरितां काहींच प्रयत्न करू नये काय, इा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. बेथमसारखे इंग्रज लोक नोकरी संभाळून मराठी भाषेचा व्यासैग करितात व त्यावर यथाशक्ति व्याख्यानेही देतात. परतु अामच्यातील सुशिक्षित लोकास मराठी ग्रंथलेखन तर लाबच, पण वाचनही कमीपणाचे वाटतें. लहानपणापासून सर्व विषयाचे ज्ञान इंग्रजी भाषेच्याद्वारें मिळवण्याची संवय लागल्यामुळे पुढे मातृभाषा परकी व अनभ्यस्त वाटून सर्व विचार, लेखन व वाचन व व्यवहार इंग्रजीमय बनून जातात. ते इंग्रजति फक्कड व्याख्याने किंवा सुंदर निबंध लिहितात; पण शुद्ध स्वभाषेत लहानसें पत्र लिहिण्याची किंवा पाच मिनिटें बोलण्याची पंचाईत असें सुशिक्षित लोक आमच्यामध्ये अजूनही आढळतात. ही फार शोचनीय स्थिती आहे. हा दोष हृल्लीचे शिक्षणक्रमाचा असो किंवा उत्तरोत्तर वाढत जाणाच्या आमच्या लोकाच्या नादानपणाचा असेो; परंतु जोपर्यंत मराठी भाषेचा आभिमान बाळगून सर्व दिशेने तिची अभिवृद्धी करणे आपलें कर्तव्य आहे असें महाराष्ट्रातील सुशिक्षित लोकास वाटत नाही तोंपर्यंत महाराष्ट्र भाषा चागल्या नावारूपास येण्याची आशा नको. हिंदुस्थानांतील ५२