पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ १६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. \ बर्डवुड व डॅक्टर पोलन यांची भाषणें झालीं, त्यांत त्यांनीं हिंदुस्थानांतील इंग्रज लोक व एतद्देशीय लोक याच्यामध्यें परिचय वाढून परस्पर सहानुभूति अधिक उत्पन्न होणे आवश्यक आहे, वगैरे आपले नेहमींचे विचार फार कळकळीनें सागितल, तें ठीकच झालें. बर्डवुडसाहेब, व पेोलनसाहेब यांनी येथे अधिकारापन्न असतांना इंग्रज व नेटिव्ह याचे दरम्यान विशेष सख्य वाढविण्यासाठी काय प्रयत्न केल व कितीसे सख्य वाढविलें हें कोणींही विचारल्यास त्याचे समाधान करणें कठीणच पडेल. तथापि विलायतेस गेल्यावर आपल्य। देशबाधवापुढे सात्त्विक व्याख्याने देणें व नेटिवाविषयीं अंत:करण पाझरवून दाखविणें कित्येक अँग्लो इंडियन कामदारास चागले साधतें हे मात्र खरे. तरी आपण पेन्शन खात आहोत, तें हिंदुस्थानातील शेतक-यांच्या पैशातून, ही खरी खरी गोष्ट डेॉ. पोलनसाहेबानी आपल्या देशबंधूपुढे निभांडपणे सांगावी ही काहीं सामान्य गोष्ट नव्हे; व या नीतिधैर्याबद्दल आपण त्याचे अभिनंदन केले पाहिजे. सदरहु व्याख्यानावरील चर्चेत अध्यक्षानीं एक विचित्न सिद्धांत ठोकून दिला त्याविषयीं दोन शब्द लिहून आजच्या मुख्य विषयाकडे वळू. बर्डवुडसाहेबांचे म्हणणें असें कीं, आजमितीस मराठी भाषेची जी हीन स्थिति होत आहे त्याचे एक मुख्य कारण मराठी वर्तमानपत्राची अभिवृद्धि होय ! देशी वर्तमानपत्रासंबंधानें अॅग्लोइंडियन कामदाराचे प्रेम अनेक मार्गाने वेळोवेळीं व्यक्त होत असतें त्यापैकीच हा एक प्रकार असला पाहिजे. वर्तमानपत्राच्या वृद्धीनें भाषेची दैना होते हे तत्त्व इंग्लंड, फ्रान्स युनायटेडरटेटस वगैरे युरोपियन व अमेरिकन राष्ट्रानाही लागू करण्यास बर्डवुडसाहेब तयार असतील, तर इंग्रजी किंवा फ्रेंच भाषसारखी निकृष्टस्थिति आज केोणत्याच भाषेची नाहीं, असे म्हणावे लागेल. देशी वर्तमानपत्रे राजद्रोही आहेत, सरकारची नालस्ती करतात, लोकास भलत्या मार्गास लावतात, आपसांत तंटे माजवतात, वगैरे अनेक प्रकारचे आक्षेप देशी पत्नावर आजपर्यंत करण्यात आले व पुढेही होतील. परंतु देशी पत्रकर्ते स्वभाषेची दैना करतात हा एक नवीनच आरोप आहे, व त्याचा आमच्या व्ययसाय बंधूंनीं अवश्य विचार केला पाहिजे. वर्तमानपत्रातील भाषेची हानि होते म्हणजे वर्तमानपत्रांतील भाषा अशुद्ध व खराब असून तीच नेहमीं लोकांच्या आगवळणी पडल्यानें भाषेला वाईट बळण लागतें असा अर्थ घेतला पाहिजे. बर्डवुडसाहेब येथे आधकारापन्न असतांना केोणती मराठी वर्तमानपत्रे वाचीत असत किंवा चांगल्या पत्रातील भाषा त्यास समजत असे कीं, नाहीं हैं कळणें भुष्कील आहे. बर्डबुडसाहेबांचा बायबल टेक्स्ट सोसायटीशीं निकट संबंध असल्या कारणान कदाचित् ज्ञानेोदय, बाळबोधमेवा वगैरे चिमुकल्या पत्राचा त्याना चांगला परिचय असेल. परंतु तेवढयावरून चागल्या मराठी वर्तमानपत्रांतील भाषेर्ने मराठी भाषा बिघडत आहे असला सरसकट सिद्धान्त ठाकून देण्यास त्यांस अधिकार पाँचती असें आम्हास वाटत नाहीं. वस्तुतः आजमितीस