पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/412

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी भाषेची लेखनपद्धति. ३९७ उच्चाराकडे पाहून शब्द लिहावयाचे म्हटल्यास भाषेस स्थैर्य व निश्चितपणा कधीही यावयाचा नाहीं. इंग्रजी भाषेत तर यासंबंधानें अतिशयच घोंटाळा आहे. Honour qi xiziáiz h as 3-art àrà Hiá; at Ascend, Descend था शब्दांतील t; चाही उच्चार बोलतांना कोणी करीत नाहीं. Know याचा उच्चार क्नो असा व्हावयास पाहिजे पण तोही नो म्हणजे no च्या उच्चारा. प्रमाणेच होतो. या त-हेची इंग्रजी भाषेत दुसरी पुष्कळ उदाहरणे आहेत व हें सर्व वैलक्षण्य काढून टाकून उच्चाराप्रमाणेच हे शब्द लिहावे, असें प्रतिपादन करणारी काहीं मंडळी इंग्लंडात निघाली आहेत, नाही असे नाहीं; पण दुसच्या पक्षी असे दाखविण्यात आले आहे कीं, हे शब्द लिहितांना केवळ त्याच्या उच्चाराकडे नजर न देता त्याच्या व्युत्पत्तीकडेही लक्ष दिले पाहिजे. उदाहरणार्थ, Ascend यात स्कंद, आणि know यांत ज्ञा (ज्या) हे जर मूळ धातू आहेत तर व्युत्पत्तीच्या दृष्टीनें त्यांची लिहिण्याची पद्धत Spelling बरोबर आहे. तसेच इंग्रजी भाषेत a या स्वराचे व्हस्व दीर्घ भदाने सहा उच्चार होतात हें इंग्रजी व्याकरणातून व कोशांतून स्पष्ट दिले आहे. तथापि याबद्दल सहा दुसरे स्वर घालण्याचे किंवा विलायतंतील शाळातून चालणाच्या क्रमिक पुस्तकात शब्दाचे जें spelling येतें त्यांत a या स्वरास खालीं वर टिंबे देऊन सहा प्रकारें अलंकृत करण्याचे विलायतेंतील कोणत्याही बुककमिटीनें योजलेलें आमच्या ऐकण्यात नाहीं; आणि कोणी योजल्यास त्याप्रमाणे व्यवस्था होईल कीं नाहीं, याचाही संशय आहे. सर्व जगभर जी भाषा चालू होण्याचा रंग आहे किंवा व्हावी असें म्हणणें आहे, तिच्या संबंधानें जर ही स्थिति तर आज अप्रौढ असलेल्या मराठी भाषेच्या शब्दांची स्वैरगती किती जखडून टाकावी, याबद्दल कोणासही शंका येणें अगदीं स्वाभाविक आहे. संस्कृतामध्ये शब्दाचीं रूपे व उच्चार यास इतर कोणत्याही भाषेपेक्षा अधिक स्थैर्य आलेले आहे खरें; पण हें स्थैर्य संस्कृत बोलण्याची भाषा होती तेव्हा आले असावें असें दिसत नाहीं.तसे असते तर वेदामध्ये*कृ' धातूचीं तीन गणातली रूपे किवा हलंत नामांची अजन्त नामाप्रमाणे रूपैं आढळण्यांतं आलीं नसती. पाणिनीच्या व्याकरणानें संस्कृत भाषेस स्थैर्य आलें आह खरें; पण पाणिनीच्या काली किंवा त्या सुमारास संस्कृत भाषा लोकांच्या बोलण्यात नव्हती, असा पुष्कळ विद्वानाचा अभिप्राय आहे. आणि तो खरा असेल तर प्रचारांतून गेलेल्या भाषेचे नियमन करणे, या दोन गोष्टींत भेद केला पाहिजे. झाड पुरें वाढले असतां त्याचा विचार लक्षपूर्वक अवलोकन करून त्याची मर्यादा ठरविणे जितकें शक्य आहे तितकें त्याची वाढ अद्याप पुरी झाली नाहीं अशा झाडाची मर्यादा ठरावणे शक्य होत नाहीं. सारांश, ज्या भाषा आज लोक बोलत आहेत त्यांची कारणे संस्कृताप्रमाणे पूर्ण होणें बहुधा अशक्य होय. तथापि व्याकरणाच्या नियभांनी वाढलेल्या भाषेचेही शेोधन करूं नये, हें म्हणणे शहाणपणाचे होणार नाहीं. अशा स्थितींत वैय्याकरणाच्या अधिकारांस कांहीं मर्यादा