पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९८ लो० टिळकांचे केसरींतील लेख. आहे, एवढाच काय तो वरील उदाहरणावरून बोध घ्यावयाचा आहे. उच्चाराप्रमाणे लिहिण्याची पद्धत ठेवणे नेहमीं शक्य नाहीं, यास दुसरीही आणखी कारणें आहेत; पण त्याचा विचार करणे पुढील लेखावर टाकणें भाग आहे.

  • मराठी भाषेची लेखनपद्धति

( नंबर् २ ) कोणत्याही भाषेची लेखनपद्धति ठरविण्यास जीं साधने आहेत त्यापैकीं उच्चार हें जरी एक साधन असलें, तथापि केवळ उच्चाराकडे नजर देऊन लेखनपद्धति ठरविणें कितपत प्रशस्त आहे याचा इंग्रजी भाषेतील उदाहरणें दऊन गेल्या अंकीं थेोडासा विचार केला आहे. व्युत्पत्तीकडे लक्ष न देतां केवळ उच्चारावरून लेखनपद्धति ठरवावयाची म्हटली तर लिहिण्याची भाषा दर पंचवीस तीस वर्षात पालटावी लागेल. इतकेंच नव्हे तर लिहिण्याच्या भार्षत काहींच कायमपणा राहावयाचा नाहीं. जिभेपेक्षां लेखणी जात्याच अधिक स्थिर असल्यामुळे कोणत्याही भाषेतील लेखनपद्धतीस जितकें स्थैर्थ असतें तितकें उच्चारपद्धतीस असत नाहीं; व म्हणूनच लेखनपद्धतीस इरएक भापेंत महत्त्व देतात. लिहिणे किंवा वाचणे यांत सारखा मेळ कधींच रहात नाही. विशेषेकरून ज्या भाषा लोकाच्या बोलण्यांत म्हणजे जिवंत आहेत त्यातील शब्दाचे उच्चार तर ती भाषा बोलणाच्या लोकाकडूनच प्रथमतः तरी समजून घेतले पाहिजेत. Put याचा उच्चार *पुट ’ कां आणि But याचा उच्चार * बट ' का ? याचे उत्तर इंग्रजी भाषेत उच्चाराच्या संख्येपेक्षा अक्षराची संख्या कमी असें सामान्यत: दिले जातें व तें खरेंही आहे. तथापि इंग्रजी शब्द व उच्चार यांच्या संबंधाने जेो हा घोंटाळा आहे तो संस्कृत व मराठी या भाषात अगदीच नाहीं असें समजूं नये. उदाहरणार्थ चवर्ग म्हणजे च, छ, ज, झ, ञ ही अक्षरें ध्या. या सर्व अक्षरांचे मराठींत दोन प्रकारचे उच्चार होतात; एक तालव्य व एक दंत-तालव्य. आणि कित्येक वेळां या दोन प्रकारच्या उच्चारानै अर्थातही मोठा फरक पडतो. जसें चरक (वैद्यक-ग्रंथकर्ता ) आणि चरक (उसाचा ); चार (४ थी संख्या) आणि चार (वेडेचार या शब्दांतील). च काराच्या उच्चाराचे हे दोन भेद एका चच्या पाठीमागें टिंब देऊन (जसे च) व दुसरा जशाचा तसाच काढून दाखवावेत, अशी युक्ति दादोबाच्या वेळीं निघाली होती; व मौल्स्वर्थच्या पूर्वी शिळेवर छापलेल्या शास्त्राच्या मराठी कोशांत याच पद्धतीचा उपयोग केलेला आहे. पण हा खटाटोप पुढे कोणी चालविला नाहीं.

  • (केसरी ता, १९ जुलै १९०४),